Immunity Booster Food : कोरोनाकाळात पैसे वाचवा, घरच्या घरी पौष्टिक खा - 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

कोरोनाकाळात लोकं पौष्टिक आहार आणि रोगप्रतिकारशक्ती या दोन गोष्टीवर जास्त भर देत आहेत.

देशात कोरोनाची परिस्थिति दिवसेंनदिवस भयावह होत चालली आहे. यामुळे लोकांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. परंतु अशा काळात आपण आपाली तब्बेत जपायला हवी. कोरोनाकाळात लोकं पौष्टिक आहार आणि रोगप्रतिकारशक्ती  या दोन गोष्टीवर जास्त भर देत आहेत. पौष्टिक आहार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते  काजू , बदाम, अक्रोड असे इतर सुका मेवा, दुध, महाग फळ आणि मग विचार येतो की, हे  खूप महाग असून आपल्या खिशाला कात्री लावणार आहे. परंतु प्रत्येक पौष्टिक आहार महागच असतो हा गैरसमज आहे. (We can eat nutritious food at home which will increase our immunity ) 

पौष्टिक व चवदार पदार्थ हे घरच्या घरी तयार करता येतात कसे ते जाणून घेऊया. असे म्हणतात की जे जिथे पिकत ते खायचे असते. आपण नेहमी इडली, पोहे, थालीपीठ, धपाटे इत्यादि पदार्थ सोडून मैद्याचे पदार्थ खातात. मोठ्या प्रमाणात साखर आसलेला जाम आपण खातो आणि पौष्टिक पदार्थ आपण खायला विसरतो आणि मग पौष्टिक म्हणून सुका मेवा खायला जातो. त्यामुळे खर्चात भर पडते. 

आपण लहान मुलांनाना दूधात बाजारातील महाग शक्तीवाढवणारी पावडर घालून देतो. त्यापेक्षा सर्वाच्या घरी नाचणीच पीठ हे असतेच. त्याची खीर ही खूप पौष्टिक असते. तसेच यात तुम्ही दूध मसाला, कोको पावडर, चॉकलेट घालून नाचणीचे एनर्जी ड्रिंक तयार करू शकता. महाग फळ आणि सुका मेवा खायलाच हवे असे काही नाही. तर केळी, पेरू, चिकू, पपई अशी अनेक फळ बारामहिने मिळतात. आंबा खाण्याची मज्जा ही उन्हाळ्यातच येते. डिसेंबरमध्ये ती मज्जा नाही येणार. 

पारंपरिक आहार हे भौगोलिक परिस्थिति याला अनुकूल असली पाहिजे. भारतात प्रत्येक राज्यात पारंपरिक जेवण हे पौष्टिक आणि तेथील वातावरनाला अनुकूल आहे. तेच ते जेवण नको झाले असेल तर आपण त्यातून च नवीन पदार्थ तयार करु शकतो. जसे की भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर वेगवेगळ्या भाज्या घालून मस्त रोल करा. वरण-भात नको असेल तर काजू, पनीर, मोड आलेल्या कडधान्यांची शाही खिचडी करा. इडली खाविशी वाटत नसेल तर त्यात पावभाजी माससला टाकून चवदार बनवू शकता. मिसळ देखील मिश्र कडधान्याची करून खाऊ शकता. 

उन्हाळ्या मध्ये शीतपेय म्हणून कैरीचे पन्हे, कलिगडचे शरबत, लिंबू पानी, सत्तू , यांचे सेवन करू शकता. आता यातील कोणते पदार्थ महाग आहेत. सगळे पदार्थ भारतीय तसेच पारंपरिक आहेत परंतु थोडा बदल करून सर्व पदार्थ नवीन रूपात आलेत. त्यामुळे घरच्या घरी चवदार आणि  पौष्टिक पदार्थ बनवता येतात आणि आपले स्वास्थ्य निरोगी राहू शकते.

संबंधित बातम्या