या राशीच्या लोकांनी हा खडा वापरल्यास होतील चांगले फायदे

हे रत्न आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करते.
या राशीच्या लोकांनी हा खडा वापरल्यास होतील चांगले फायदे
Wear these birthstone as per your zodiac signDainik Gomantak

आपल्या आयुष्यावर बर्थस्टोन आणि जर्मस्टोन यांचा खूप प्रभाव पडतो. यामुळे आपल्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास मदत करते. यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या देखील कमी होतात. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता खडा घालावा.

* मेष (Aries)

या राशीच्या लोकांनी आरोग्य चांगले राहण्यासाठी लाल जस्पर आणि कार्नेलियन खडा घालावा. यामुळे या लोकांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी लाभते.

* वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना अनेक आर्थिक समस्याना सामोरे जावे लागते. यामुळे या राशीच्या लोकांनी लॅपिस लाझुली आणि रोज क्वार्ट्ज हा खडा घालावा. यामुळे या लोकांच्या आयुष्यातील समस्या कमी होतील.

* मिथुन (Gemini)

ही रास बुधाच्या अधिपत्याखाली येते. या राशीच्या लोक समस्यामुळे गोंधळलेले असतात. यामुळे या राशीच्या लोकांनी गोल्डन टोपज (Goldan Topaz) आणि चालेस्डोनी (chalcedony) हा खडा घालावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच या लोकांचा उडणारा गोंधळ सुद्धा कमी होतो. यामुळे या राशीच्या लोकांचे ध्येय पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित होते.

Wear these birthstone as per your zodiac sign
Health And Fitness Tips: कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक

* कर्क (Cancer)

चंद्र हा ग्रह कर्क राशीवर राज्य करतो. या राशीचे लोक खूप भावनिक असतात. पण या राशीच्या लोकांना खूप संघर्ष करावा लागतो. म्हणून या लोकांनी मूनस्टोन आणि लेब्राडोराइट हा खडा घालावा. यामुळे या राशीच्या लोकांचे आयुष्यातील संघर्ष कमी होण्यास मदत मिळते.

* सिंह (Leo)

या राशीवर सूर्याचा प्रभाव असतो. या राशीचे लोक अहंकारी असतात. यामुळे अशा लोकांनी रॉक क्रिस्टल आणि ऑलिव्हिन हा खडा घालावा. यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांच्यातील अहंकाराची भावना कमी होण्यास मदत मिळते.

* कन्या (Virgo)

या राशीवर बुध प्रभावी असतो. या राशीचे व्यक्ती भावनिक आणि हळव्या मनाचे असतात. यासाठी या राशीच्या लोकांनी एलो अगटे आणि जास्पर हा खडा घालावा. यामुळे या राशीच्या लोकांचे आरोग्य निरोगी राहून आयुष्यात सुख- शांती लाभते.

* वृश्चिक (Scorpio)

या राशीवर मंगळचा प्रभाव असतो. या राशीचे लोक उत्साही आणि कोणताही निर्णय घेण्यास खंबीर असतात. या राशीच्या लोकांनी गार्नेट आणि गोमेद हा खडा घालावा. यामुळे सकरात्मक ऊर्जा निर्माण होते आणि अकाली वृद्धत्वापासून सुटका होण्यास मदत मिळते. तसेच आयुष्यात सुख-शांती लाभते.

* धनू (Sagittarius)

या राशीचे लोक नेहमी तणावात असतात. या राशीच्या लोकांनी निलमणी आणि लापिस हा खडा घालावा. यामुळे या लोकांच्या आयुष्यामधील ताण कमी होण्यास मदत मिळते.

* तूळ ( Libra)

या राशीवर शुक्राचा प्रभाव अधिक असतो. या राशीच्या लोकांनी नीलमणी आणि क्रायसोकोला हा खडा घातल्याने आयुष्यातील समस्या कमी होऊन सुख- समृद्धी लाभते.

Wear these birthstone as per your zodiac sign
Health And Fitness Tips: कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक

* मकर

या राशीवर शणीचा प्रभाव असतो. या राशीच्या लोकांनी गोमेद आणि ओब्सीडियन हे रत्न घालावे. यामुळे त्यांच्या आयुष्यातील दुख कमी होऊन सुख- समृद्धी लाभेल. तसेच आयुष्यात यश प्राप्त होण्यास मदत मिळते.

* कुंभ

या राशीवरसुद्धा शणीचा प्रभाव असतो. या राशीतील लोक मनोरंजन क्षेत्रात अधिक रस घेतात. या लोकांनी फाल्कन आईज आणि निळसर रंगाचा खडा घालावा. यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

* मीन

या राशीवर गुरुचा प्रभाव असतो. या राशीच्या लोकांनी कोरल आणि ऑलिव्हिन हा खडा घालावा. यामुळे आत्मविश्वास वाढून सकारात्मक ऊर्जा निमण होते. तसेच आयुष्यात सुख-शांती लाभते.

आपल्या राशीनुसार खड्याची निवड करावी. तुम्ही हे रत्न अंगठी, पेडेंट, नोज रिंग किंवा हातील कड म्हणून घालू शकता. तसेच तुम्ही हे रत्न तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये देखील ठेवू शकता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com