Weight Loss: इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर?

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

आपण अधूनमधून उपास केला आणि ब्लॅक कॉफी प्यायली तर ते फारसे हानिकारक होत नाही. परंतु हे दिवसभरात आपण किती कप कॉफी पितो यावर अवलंबून असते.

स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच लोक वेगवेगळे आहार व व्यायामाचे पालन करतात. वजन कमी करण्यासाठी लोक हेल्थ ड्रिंक घेवून आपला दिवस सुरू करतात. काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात  कप कॉफीने करतात. कॉफी पिल्याने स्फूर्ती येते.

कॉफीमध्ये कॅफिन असते जे आपल्याला ऊर्जा देते. पण जे इंटरमिटेंट फास्टिंग करतात. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. परंतु जास्त प्रमाणात कॉफी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण अधूनमधून उपास केला आणि ब्लॅक कॉफी प्यायली तर ते फारसे हानिकारक होत नाही. परंतु हे दिवसभरात आपण किती कप कॉफी पितो यावर अवलंबून असते.

ब्लॅक कॉफी इंटरमिटेंट फास्टिंग फायदेशीर ठरते

उपवास करताना कॉफी पिणे आपल्यासाठी चांगले आहे. त्यात कमी कॅलरी असतात. म्हणूनच डाएटिशन्स आपल्याला ब्लॅक कॉफी पिण्याची शिफारस करतात. ब्लॅक कॉफीमध्ये 2 ते 3 कॅलरींची संख्या असते. त्यात खनिज व प्रथिने कमी प्रमाणात असतात. कॉफी पिण्यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही. जर आपण दिवसभर 2 ते 3 कप कॉफी प्याला तर त्याचा आपल्या पचनशक्ती आणि वजन कमी करण्यावर फारसा परिणाम होणार नाही. म्हणूनच ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर आहे.

दररोज किती कप कॉफी प्या

कॉफी कमी कॅलरीयुक्त पेय आहे. हे आपली भूक शांत करते. दररोज 2 ते 3 कप ब्लॅक कॉफी पिणे चांगले आहे. परंतु जर तुम्ही जास्त कॉफी प्यायली तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कॉफी पिण्यामुळे डोकेदुखी, हृदय गती वाढणे, तणाव आणि झोपेच्या पद्धतींशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कॉफी पिताना साखर, मलई इत्यादी गोष्टी लक्षात घ्या. आपण साखरेऐवजी मध आणि गूळ वापरू शकता

या लोकांनी पीवू नये कॉफी

बर्‍याच अभ्यासानुसार असे आढळले आहे की जे लोक नियमितपणे उपवास करतात आणि ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी कॉफी पिऊ नये. कॅफिनमुळे रक्तदाब वाढतो. म्हणून कॉफी घेण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांकडून नक्कीच सल्ला घ्या.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय

वजन कमी करण्यासाठी हल्ली अधूनमधून उपवास करणे लोकप्रिय झाले आहे. इंटरमिटेंट फास्टिंग हा कोणत्याही प्रकारचा डाइट नाही. हा एक जोवणाचा पैटर्न आहे, ज्यामध्ये आपल्याला न खाता 12 ते 16 तास रहावे लागते.

डेस्टिनेशन वेडिंग करायचंय? ही आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं

 

संबंधित बातम्या