Weight Loss Juice: वजन कमी करण्यासाठी प्या "हे" घरगुती ज्यूस 

Weight Loss Juice: वजन कमी करण्यासाठी प्या "हे" घरगुती ज्यूस 
Fruits Juice

Weight Loss Juice: आपल्या आरोग्याच्या विकासासाथी फळे ही लाभदायक असतात. रसाळ फळ देखील आरोग्यासाठी फायद्याचे असतात. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ज्यूसचा सोपा आणि सरळ मार्ग स्वीकारू शकता. अनेक रसाळ फळांमध्ये साखरेच प्रमाण अधिक असते. आणि फायबरचे प्रमाण देखील अधिक असते. अशा फळांच्या रसातून आपल्या शरीराला जास्त प्रमाणात  कॅलरी मिळतात. त्यामुळे वजन वाढते. तसेच  स्टोअरमधून खरेदी केलेल्या फळांचे रस जरीही चवदार असेल परंतु त्यात साखरेच प्रमाण तितकेच अधिक असते. पण अशी अनेक फळे आहे की ज्यांचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. फळांचा घरगुती ज्यूस तयार करण्यासाठी आपण ब्लेंडरचा वापर करतो. फळांचा रस काढण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. कारण यात फायबरचे प्रमाण कमी असून भूक कमी करण्यास मदत होते. त्यामुळेच आज वजन कमी करण्यासाठी फळांचे ज्यूस जाणून घेऊया.  (Weight Loss Juice: Drink "this" homemade juice to lose weight)

1) बीट ज्यूस:

बीटचा ज्यूस हा शरीरसाठी फायद्याचा आहे. यामध्ये  व्हिटॅमिन सी, फायबर, असे अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. आपण बीट वाफवून किंवा भाजून खाऊ शकतो. परंतु बीट शिजवल्यामुळे त्यामधील पोषकतत्वे कमी होतात. त्यामुळेच बीटचा रस सर्वात जास्त फायद्याचा ठरतो. बितच्या रसात कॅलरीज्  कमी असल्याने हा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. बीटमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम हे खनिज असते. यामुळे वजन कमी करणाऱ्यासाथी हा ज्यूस फायदेशीर ठरतो.   

2) हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस:
फळांच्या रसाबरोबरच आपण हिरव्या पालेभाज्यांचा रस देखील पिऊ शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये पालक, कोबी, यारख्या भाज्या घालून रस तयार करू शकतो. या रसात फायबरचे प्रमाण अधिक असते 
आणि साखरेच प्रमाण कमी असते. आयुर्वेदात देखील हिरव्या पालेभाज्याच्या रसाळ महत्व प्राप्त झाले आहे.  

3) डाळिंब आणि गाजराचा ज्यूस:
डाळिंबामध्ये फायबर,   पोटॅशियम, लोह यासारखे घटक मोट्या प्रमाणात असतात. जर आपण वाढत्या वाजनाला कंटाळले असला तर नियमितपणे  डाळिंबाचा रस पिऊ शकता.    
याचा ज्यूस कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच  डाळिंबाचा रस शरीरातील रक्त वाढण्यास मदत करते आणि अनेक आजारांवर गुणकारक आहे. वजन कमी करण्यासाठी गाजराचा रस खूप फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांची  दृष्टी वाढण्यास मदत होते.  गाजराचा ज्यूस  प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून दूर ठेवते. 

4) आल- लिंबाचा ज्यूस:
लिंबू आणि आल्यामुळे रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत होते. या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी या रसाचे सेवन करू शकतो. आल शरीराची पंचन क्षमता वाढविण्यास मदत करते. त्यामुळे 
वजन आणि भूक कमी होण्यास मदत होते.    

5) कलिंगडचा ज्यूस: 
उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी वाढविण्यास याची मदत होते. कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते.त्यामुळे हे शरीराला हायड्रेटेड ठेवते.  कलिंगडचा रस नियमित प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कलिंगडमध्ये  व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि अँटिऑक्सिडेंट्स सारखे अनेक तत्वे असतात.  कलिंगडामध्ये असलेल्या पोषक तत्वामुळे हृदयविकार, कर्करोग यासारख्या आजारांपासून बचाव करू शकते. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com