Health Tips: वजन कमी करण्यास व्हिटॅमिन-डी फायदेशीर, जाणून घ्या

Health Tips: आपली त्वचा सूर्य किरणांच्या संपर्कात आल्यावर व्हिटॅमिन-डी तयार होते.
Vitamin D
Vitamin DDainik Gomantak

Health Tips: व्हिटॅमिन-डी हे असे एक पोषक तत्व आहे, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. इतकेच नाही तर कॅल्शियम शोषून घेण्यात आणि हाडांचे स्वास्थ सुधारण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. व्हिटामिन डीमुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. दुसरीकडे, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे विविध प्रकारचे रोग होऊ शकतात. ज्यात टाइप-2 डायबिटीज, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

व्हिटॅमिन-डी ला सनशाईन व्हिटॅमिन (vitamin) असेही म्हणतात. हे एक स्टेरॉइड हार्मोन आहे. जे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलपासून तयार होते. जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कात येते. व्हिटॅमिन डी प्रतिकारशक्ती वाढवणे, हाडांचा मजबूतपणा, स्नायू तयार करणे, इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता उलट करणे, सांधेदुखी कमी करणे, कर्करोग रोखणे आणि वजन (weight) कमी करणे यासाठी आवश्यक आहे.

Vitamin D
Hair care Tips: केसांच्या आरोग्यासाठी बदामाच्या सालीचे जादुई फायदे, जाणून घ्या

जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या किरणांच्या संपर्कात येते, तेव्हा व्हिटॅमिन-डी तयार होते आणि ते प्रीव्हिटामिन-डी3 देते, जे यकृत आणि मूत्रपिंडांमध्ये व्हिटॅमिन-डी3 च्या सक्रिय स्वरूपात रूपांतरित होते. हे जीवनसत्व चरबीत विरघळणारे असल्यामुळे ते शरीरात दीर्घकाळ साठवले जाते.

पण व्हिटॅमिन-डीसाठी सूर्याची किरणे पुरेशी आहेत का? तर नाही. ज्या लोकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, जसे की वृद्ध लोक किंवा डार्क स्किन टोन असलेल्या लोकांमध्ये नेहमी व्हिटॅमिन डीची कमतरता असते. ज्या लोकांची स्किन टोन डार्क आहे, त्यांच्यात मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे अतिनील किरणं त्वचेत कमी शोषले जातात. त्याच वेळी, ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांना व्हिटॅमिन-डी जास्त मिळते.

अन्नातून व्हिटॅमिन-डी कसे मिळवायचे?

मासे, अंड्यातील पिवळ बलक, मशरूम, कॉडलिव्हर ऑइल, दूध, टोफू, दही, संत्र्याचा रस, चीज या पदार्थांमधून व्हिटॅमिन-डी शरीराला मिळते.

अधिक सांगायचे तर, व्हिटॅमिन-डी शरीरातील नवीन फॅट तसेच पेशींचे उत्पादन कमी करू शकते. व्हिटॅमिन-डी सेरोटोनिन आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकते, जे तुमची चयापचय वाढवण्यात, तुमच्या शरीराला अधिक कॅलरी बर्न करण्यात, भूक नियंत्रित करण्यात, तृप्तता वाढवण्यात, शरीरातील चरबी कमी करण्यात आणि वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

व्हिटॅमिन-डीची कमतरता असेल तर महिला आणि पुरुषांमध्ये केस गळणे, केस कोरडे पडणे या समस्या निर्माण होतात. स्नायु, दात आणि हाडांना मजबूत करायचे असेल शरीराला व्हिटॅमिन-डी आवश्यक असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com