गुणकारी कडुनिंबाचे किती फायदे किती नुकसान?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

कडुनिंब चहा एक नैसर्गिक कडू चहा आहे. जो आयुर्वेदिक औषधीमध्ये अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. कडुनिंब आपल्यासाठी अनेक प्रकारे कार्य करते. 

कडुनिंब चहा एक नैसर्गिक कडू चहा आहे. जो आयुर्वेदिक औषधीमध्ये अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो. कडुनिंब आपल्यासाठी अनेक प्रकारे कार्य करते. कडुनिंब दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असले तरी, सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील कडुलिंबाचे तेल वापरले जाते. त्याचप्रमाणे कडुनिंबाचा चहा सुद्धा अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

कडुनिंब चहाचे फायदे:

या व्यतिरिक्त काही लोक जखमाला लावण्यासाठी आणि त्वचेच्या इतर समस्यांसाठी कडुनिंबाचा वापर करतात. त्याचबरोबर कडुनिंब चहा बरेचसे फायदे आहेत. कडुनिंब शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी प्रभावी आहे. कडुनिंबाचा चहा तोंडाची दुर्गंधी दूर करतो. 

रोगप्रतिकार शक्ती वाढविते

आजारांशी लढायला मदत करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कित्येक अभ्यासातून निंबामध्ये अँटीबैक्टीरियल, अँटीफंगल गुणधर्म असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत कडुनिंबाचा चहा बर्‍याच आजारांपासून बचाव करण्यासही उपयुक्त ठरेल.

जोस्वंदिचे फूल असेही गुणकारी

तणाव कमी करण्यास मदत करते
कडुनिंबाचा चहा शरीरातील ताण कमी करण्यास उपयुक्त आहे. जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्ही एक कप कडुनिंबचा चहा पिऊ शकता. 

रक्त स्वच्छ करते
आरोग्याच्या अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. कडुलिंबाच्या औषधी गुणधर्माचा आपल्याला बर्‍याच प्रकारे फायदा होतो. शरीरातील रक्त स्वच्छ करण्यास आणि निरोगी राहण्यास मदत करते. 

कर्करोगाच्या पेशी तयार होण्यापासून बचाव

कडुनिंबाचा चहा शरीरात वाढणार्‍या कर्करोगाच्या पेशीपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. एक कप कडुनिंबाचा चहा रोज घेतल्यास या आजारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

डोक्यातील कोंडा कमी करते

जर आपण कोंडाच्या समस्येशी त्रासून गेला असाल तर आपण कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवा. नंतर हे पाणी थंड करा आणि केस धुताना या पाण्याचा वापर करा. मग केस स्वच्छ करा. तुमच्या डोक्यातील कोंडा नक्कीच कमी होइल.

गर्भवती महिलांनी का घेवू नये
कडुलिंबाची चही तर तसा अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पण काही लोकांनी हा चहा पिणे टाळावे. खासकरून गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या चहाचे  सेवन केले पाहिजे.

या लोकांना टाळावे कडुनिंबचे सेवन
कडुनिंबचा चहा स्तनपान करणाऱ्या महिलांनी पिवू नये. त्याचबरोबर ज्यांनी अवयव प्रत्यारोपण केले आहे किंवा दोन आठवड्यांच्या आत कुठली शस्त्रक्रिया केली आहे त्यांनी देखील हा चहा किंवा रस पिऊ नये.

रक्तातलं साखरेचं प्रमाण कंट्रोल करायचंय? कांदा करेल मदत 

संबंधित बातम्या