'Copper Water' चे काय आहेत फायदे

तांब्याच्या भांड्यातील पाणी (Copper Water) हे आरोग्यासाठी नेहमीच गुणकारी मानले जाते
 'Copper Water' चे काय आहेत फायदे
Copper WaterDainik Gomantak

तांब्याच्या भांड्यातील पाणी (Copper Water) हे आरोग्यासाठी नेहमीच गुणकारी (Good For Health) मानले जाते, तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी स्वयंपाक सुद्धा तांब्याच्या भांड्यातच शिजवला जायचा. पण गेले 20 एक वर्षात तांब्याची आणि पितळेची भांडी कमी होऊन त्याची जागा आता जर्मन आणि स्टील च्या भांडयानी घेतली आहे जे आपल्या आरोग्याला अतिशय घातक आहे. पण आता पुन्हा लोकानां तांब्याच्या भांड्याच महत्व कळले असून, याचा वापर सध्या वाढला आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितले आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे खरंच फायदेशीर आणि सुरक्षित आहे की आणखी एक फॅड आहे.

 Copper Water
Ganesh Chaturthi 2021: बाप्पांच्या स्वागतासाठी सोप्या Decoration Ideas

काय आहे कॉपर वॉटर ट्रेंड?

कॉपर वॉटर हे पेय नाही जे तुम्हाला जवळच्या सुपरमार्केट किंवा हेल्थ स्टोअरमध्ये मिळेल. हे आपल्याला तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ते बनवावे लागते.तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवल्याने धातूला पाण्यात प्रवेश करता येतो, त्यामुळे पिणाऱ्याला फायदा होतो.आपल्या शरीराला खनिजांची तसेच धातूची गरज असते ती आपल्याला तांब्याच्या भांड्यातून मिळतात.

 Copper Pot
Copper Pot Dainik Gomantak

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध

विज्ञानाद्वारे सांगितले गेले की तांब्याच्या भांड्यातील फायद्यांमध्ये हा महत्वाचा गुणधर्म आहे हे पाणी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतो. जुने आणि अलीकडील दोन्ही पुरावे हेच सांगतात की तांब्याचा वापर जलशुद्धीकरण किंवा निर्जंतुकीकरण प्रणाली मध्ये केला जातो, अशी नोंद प्राचीन आयुर्वेद तंत्रांमध्ये होती. फक्त तांब्याच्या भांड्यात पाणी साठवल्याने हे हानिकारक जीवाणू नष्ट होऊ शकतात.

 Copper Water
Vastu Tips: जर तुम्हाला नोकरीची चिंता सतावत असेल तर 'या' टिप्स करा फॉलो!
 Copper Bottle
Copper Bottle Dainik Gomantak

फायदे

समर्थक असा दावा करतात की तांब्याच्या भांड्यातील पाणी अनेक फायदे देतात

हृदय आरोग्य चांगले राहते

मेंदूचे आरोग्य चांगले राहते

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

वजन कमी होते

त्वचेचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे.

नवीन रक्तवाहिन्यांची निर्मिती होते

या पाण्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही हानिकारक परिणाम होणार नाही.

हे पाणी पूर्ण पाने शुद्ध असते या मध्ये कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया नसतात

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com