श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती?

श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती?
breathing

एकवेळ आपण अन्न, पाण्याशिवाय राहू शकतो. मात्र, श्वासाशिवाय राहणं शक्यच नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक कार्य सुरळीत राहण्यासाठी श्वास अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. त्यामुळे तुम्ही दोन दिवस उपाशी राहू शकता. पण, श्वासाशिवाय दोन सेकंदसुद्धा तुम्हाला राहता येणार नाही. श्वास रोखला तर लगेच गुदमरल्यासारखं होईल. यावरुनच श्वास आपल्यासाठी किती महत्त्वाचा आणि गरजेचा आहे हे स्पष्ट होतं. परंतु, श्वास घेणं म्हणजे केवळ शरीरात हवा घेणे व ती नाकावाटे बाहेर सोडणं इतकंच मर्यादित नाही. तर श्वास घेण्याचीदेखील एक पद्धत आहे व त्या पद्धतीनेच जर आपण श्वास घेतला तर नक्तीच त्याचा शरीरासाठी फायदा होईल. म्हणूनच, श्वासोच्छवासाची योग्य पद्धत कोणती ते पाहुयात.(What is the best way to breathing)

खांदे व छातीवर ताण घेऊन श्वास घेऊ नका 

तुम्ही कधी लहान बाळाला श्वास घेताना पाहिलं आहे का?  लहान बाळ श्वास घेताना पोटाचा वापर करतं. परंतु, आपण मोठे झाल्यावर छातीचा वापर करून श्वास घेऊ लागतो. तोंडाने श्वास घेणे किंवा छातीच्या वरच्या भागाचा व खांदे यांचा अतिवापर हा सहसा व्यायाम करताना आणि स्ट्रेसमध्ये होतो. परंतु चुकीच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीने इतर वेळीसुद्धा आपल्या नकळत अशीच पद्धत चालू राहते. 

श्वास घेण्याची योग्य पद्धत 

श्वास घेण्याची योग्य पद्धत म्हणजे डायफ्रॅमचा वापर करणे. थोडक्यात श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना आत. ही पद्धत अवलंबण्यासाठी दररोज सराव करावा. दिवसातून २-३ वेळा तरी डोळे मिटून, शांतपणे, एका जागी बसून, पोटावर हात ठेऊन दीर्घ श्वास घेताना पोट बाहेर आणि सोडताना पोट आत असे निरीक्षण करत श्वास घेण्याचा सराव करावा. याने श्वासाच्या पद्धतीत सुधारणा होऊ लागते व मनही शांत होते, आणि थोडा काळ का होईना ध्यानाचाही अनुभव घेता येईल. 

प्राणायामही गरजेचा!

योग्य जीवनशैली, माफक आहार, पुरेशी झोप, निरोगी सवयी, योग्य शिथिलीकरण, जागरूकता हे सर्व श्वासावर त्यांचा परिणाम दाखवतात. त्याच बरोबरीनं रोज प्राणायामाचा सराव करावा. विशेषत: सध्याच्या अस्वस्थतेच्या काळात तर व्यायामाच्या जोडीने रोज प्राणायामाचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण हे लक्षात घ्या की प्राणायाम हा व्यायामासारखा न करता योगात अभिप्रेत आहे त्यासारखा करावा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dainik Gomantak (@dainikgomantak)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com