दिवाळीच्या सणामध्ये काय आहे धनत्रयोदशीचं विशेष महत्व?

तेव्हा यम यांच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तो सोन्या चांदीकडे (gold and silver) आकर्षित होतो.
धनत्रयोदशीची पूजा
धनत्रयोदशीची पूजा Dainik Gomantak

दिवाळीच्या सण हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला (Diwali) कालपासून सुरूवात झाली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या दिवाळीची सुरुवात वसुबारस म्हणजेच गाईची पूजा करून होते. या सणामध्ये धनत्रयोदशीला एक विशेष महत्व आहे. (Dhantrayodashi) या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म आजच्या दिवशी झाला असा समज आहे. या दिवशी घरामधील आणि व्यवसाया मधील धनाची म्हणजेच पैश्याची पूजा केली जाते. व्यसायामध्ये हिशेबाच्या नवीन वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची प्रथा आहे.

आजच्या दिवशी असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांचा शाप निवाराणास समुद्र मंथन करण्यात आले. तेव्हा यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली. समुद्र मंथनामधून धन्वंतरी अमृत घेऊन बाहेर आली. म्हणून या दिवशी धन्वंतरीची सोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. व्यापारी वर्गात या पूजेचे विशेष महत्त्व आहे. तसेच या दिवशी सायंकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नवीन वह्यां वापरण्याची प्रथा आहे.

धनत्रयोदशीची पूजा
दिवाळी फटाके आणि नियम

धनत्रयोदशीची काय आहे कथा:

एका कथेनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी त्याचा मृत्यु होणार होता. आपल्या पुत्राने सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरले जाते. सर्व महाल दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. रात्री ती त्यास विविध गाणी, गोष्टी सांगत जागे राहतात.

तेव्हा यम यांच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा तो सोन्या चांदीकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेरील दिव्याच्या वातीचे टोक दक्षिणेच्या दिशेला करण्यात येते. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करण्यात येतो. याने अनर्थ टळतो असा समज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com