
हृदयविकाराची समस्या सध्या झपाट्याने वाढत आहे. अनेकजण या समस्येने ग्रस्त आहेत. हृदयविकाराची समस्या निर्माण होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातील एक म्हणजे शरीरातील कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी बिघडल्यास हृदयविकाराची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल ही मेणासारखी दिसणारी चरबी असते. यात दोन प्रकार असून कमी घनता लिपोप्रोटीन आणि उच्च घनता लिपोप्रोटीन.
जर तुमच्या रक्तात LDL चं प्रमाण जास्त झालं तर ब्लड आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिट वाढतं, ज्याला प्लॅक म्हटलं जातं. आर्टरीजमध्ये प्लॅकच्या समस्येने हार्ट अटॅक तसंच स्ट्रोकचा धोका वाढतो. तर दुसरीकडे रक्तात HDL म्हणजेच गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी उत्तम मानलं जातं. डॉक्टर किंवा तज्ज्ञ मंडळी HDL, LDL आणि टोटल कोलेस्ट्रॉल मोजू शकतात. नॉन-एचडीएल फॅटा स्तर तुम्हाला समजू शकतो. हे घटक हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढवतात. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या वयानुसार शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल (Cholesterol level) किती असलं पाहिजे
19 वर्ष वयोगट-
मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, 19 वर्षांपर्यंतच्या तरूणांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल 170mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. याचं non-HDL 120 mg/dl पेक्षा कमी आणि LDL 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL 45 mg/dl पेक्षा जास्त असलं पाहिजे.
20 वर्ष वयोगट-
20 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांच्या शरीराचं टोटल कोलेस्ट्रॉल 125-200 mg/dl च्या मध्ये असलं पाहिजे. तर दुसरीकडे non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असायला पाहिजे. HDL लेवल 40 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक होणं गरजेचं आहे.
20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील स्त्रियांचं कोलेस्ट्रॉल लेवल-
20 वर्षांपेक्षा जास्त वयातील महिलांच्या शरीरात टोटल कोलेस्ट्रॉल 125–200 mg/dl मध्ये असलं पाहिजे. याशिवाय non-HDL लेवल 130 mg/dl पेक्षा कमी आणि LDL लेवल 100 mg/dl पेक्षा कमी असलं पाहिजे. तर HDL लेवल 50 mg/dl किंवा त्यापेक्षा अधिक असलं पाहिजे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.