Mantra Chanting: कोणता जप करताना कोणती माळ वापरावी?

कोणत्या देवाचे नामस्मरण करताना किंवा कोणत्या मंत्राचे जाप करतांना हाती कोणती माळ घ्यावी हे जाणून घेउया.
Mantra Chanting
Mantra ChantingDainik Gomantak

Mantra Chanting: हिंदू धर्मात प्रत्येकजण पूजा-अर्चनाला महत्व देतो. रोज सकाळी घरी आंघोळ केल्यावर पहिल्यांदा घरातल्या देवांची पूजा करुनच घराबाहेर पहतात. वेळ असल्यास आपण देवळात जातो. तिथेही वेगवेगळ्या देवतांची आपण पूजा करतो.

(Which mala should be used while Mantra chanting)

अनेकदा पूजा करताना काहीजणं जप करतांना माळेचा उपयोग करत असतात. जपमाळ ओढण्याचं शास्त्रीय कारण मनाची एकाग्रता हे असले तरीही मुखी परमेश्वराचं नाव आणि त्यासोबत जपमाळेचे एकएक मणी ओढणे असे सर्वसाधारण चित्र आपल्याला पाहायला मिळते.

पण कोणत्या देवाचे स्मरण करताना किंवा कोणता मंत्र जपतांना हाती कोणती माळ असावी याचीही माहिती हिंदू धर्मशास्त्रात दिली आहे.

Mantra Chanting
Astro Tips For Tulsi: तुळशीला चुकूनही 'या' दिवशी पाणी अर्पण करू नका , माता लक्ष्मी होईल नाराज

कोणती माळ केव्हा वापरावी

  • तुळसीची माळ

तुळशीची माळ खास करुन भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय, भगवान राम आणि श्री कृष्णाच्या मंत्रांचा जप करण्यासाठी तुळशीची माळ वापरणे चांगले आहे कारण धार्मिक ग्रंथांनुसार भगवान श्री राम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत.

  • स्फटिकांची माळ

स्फटिकांची माळ माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्रांच्या जपासाठी वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवी माता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठीही स्फटिक मणी वापरली जाते. 

  • रुद्राक्षाची माळ 

रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ मानले जाते. कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्रांचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचे धार्मिक महत्त्व खूप आहे.

  • कमलगट्टाची माळ

ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांसाठी वापरली जाते. कमलगट्टा जपमाळेतही 108 मणी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com