Swastika: घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे

Swastika: घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे
Dainik Gomantak

Vastu Tips: सनातन धर्मात स्वस्तिक चिन्हाला (Swastika Sign) खूप महत्त्व दिले गेले आहे. स्वस्तिकला भारतीय संस्कृतीचे प्रतीक मानले जाते, जे नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) दूर घालवत, घरात आनंद आणि समृद्धी घेऊन येते. यामुळेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी किंवा उत्सव साजरा करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह असणे चांगले मानले जाते.

स्वस्तिक चिन्हाचे चार हात

सर्वप्रथम, स्वस्तिक चिन्ह काय आहे ते जाणून घेऊया. सनातन धर्मानुसार स्वस्तिक चिन्हात समांतर स्वरूपात 4 हात बनवले आहेत. या चार दिशा निसर्गाच्या चार दिशांचे प्रतीक आहेत. चार हात थोडेसे उजवीकडे वळतात. अशा प्रकारे बनवलेले स्वस्तिक चिन्ह मानवी जीवनासाठी अत्यंत कल्याणकारी आणि शुभ मानले जाते.

Swastika: घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे
‘मोस्ट वॉन्टेड’ गुंड विक्कीच्या गोवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या

तीन अक्षरांनी बनलेले आहे स्वस्तिक

स्वस्तिक हा शब्द तीन अक्षरांनी बनलेला आहे. यामध्ये सु, अस आणि क या अक्षरांचा समावेश आहे. यामध्ये सु म्हणजे चांगले, अस म्हणजे अस्तित्व आणि क म्हणजे कर्ता. म्हणून जो शुभ कार्य करतो. यामुळेच हे स्वस्तिक चिन्ह अतिशय शुभ मानले जाते.

घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह?

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच स्वस्तिक चिन्ह का काढले जाते असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर असे आहे की, ज्योतिषशास्त्रात (Astrology) असे मानले जाते की सर्व चांगल्या आणि वाईट शक्ती मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करतात. आणि जर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावले तर ते एखाद्या रक्षकाप्रमाणे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखते.

Swastika: घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे
Utpal Parrikar : उत्पल पर्रीकर यांची प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर गुप्त बैठक

असेही मानले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरामध्ये दारिद्र्य आणि रोग येत नाहीत, त्यामुळे कुटुंब नेहमी सुखी आणि समृद्ध राहते. ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या मुख्य गेटवर नेहमी हळदीने स्वस्तिक चिन्ह लावावे. हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत आणि ती सूक्ष्मजीव आणि विषाणूंसह नकारात्मक शक्तींसाठी अवरोध करते.

नेहमी उत्तर किंवा उत्तर दिशेला काढा स्वस्तिक

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवताना योग्य दिशा जाणून घेणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे. या दिशांना स्वस्तिक बनवल्याने देव-देवतांची कृपा कुटुंबावर कायम राहते अशी मान्यता आहे.

Swastika: घराच्या मुख्य दारावर का काढतात स्वस्तिक चिन्ह? जाणून घ्या महत्त्व आणि फायदे
बलात्कार पीडितेचा जबानी देण्यास नकार; आरोपी मोकाट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com