International Men's Day 2022: आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची कशी झाली सुरुवात? वाचा एका क्लिकवर

International Men's Day History: यंदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम 'पुरुष आणि मुलांची मदत' अशी आहे.
International Men's Day 2022:
International Men's Day 2022: Dainik Gomantak

दरवर्षी 19 नोव्हेंबर हा दिवस जगभरातील 60 हून अधिक देशांमध्ये 'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा (International Men's Day 2022) करण्यामागील मुख्य उद्दिष्टे म्हणजे पुरुषांचे मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचे कौतुक, लैंगिक समानता इत्यादी आहे. 2007 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला.

  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम कोणती?

या वर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम 'पुरुष आणि मुलांची मदत' अशी आहे. ज्याचा उद्देश जागतिक स्तरावर पुरुष आणि मुलांचे आरोग्य आणि कल्याण सुधारणे आहे. यापूर्वी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची थीम 'स्त्री आणि पुरुषांमधील चांगले संबंध' अशी ठेवण्यात आली होती.

International Men's Day 2022:
World Toilet Day 2022: इंडियन की वेस्टर्न कोणत्या शैलीतील शौचालय तुमच्या आरोग्यासाठी चांगले?
  • आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात कशी झाली?

1923 मध्ये काही पुरुषांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या धर्तीवर 23 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याची मागणी केली. यानंतर 1968 मध्ये अमेरिकन पत्रकार जॉन पी. हॅरिस यांनी एक लेख लिहिला की सोव्हिएत व्यवस्थेत संतुलनाचा अभाव आहे. ही प्रणाली महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करते. परंतु पुरुषांसाठी कोणत्याही प्रकारचा दिवस साजरा करत नाही. यानंतर 19 नोव्हेंबर 1999 रोजी प्रथमच त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांनी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com