पतीला मैत्रिणीशी करायचे होते लग्न..; पत्नीनेच लावून दिला पतीचा दुसरा विवाह...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

समाजाचा किंवा स्वत:चा विचार न करता पत्नीनेच पतीच्या दुसऱ्या विवाहाला मान्यता दिली आहे.  

भोपाल-  लग्न म्हणजे एक बंधन समजले जाते. यात एकदा अडकल्यावर सुटका नाही हा सर्वांचा समज आहे. अर्थात काही प्रमाणात ते खरेच आहे. लग्न झाल्यावर तुमच्यावर येणाऱ्या अधिकच्या जबाबदाऱ्या, पालक असाल तर अधिक संवेदनेने वागावे लागते, नातेवाईकांच्या मनातील आपले स्थान चांगले राहण्यासाठी झटावेही लागते. मात्र, भोपाळमधील एक दाम्पत्य याला अपवाद ठरले आहे. समाजाचा किंवा स्वत:चा विचार न करता पत्नीनेच पतीच्या दुसऱ्या विवाहाला मान्यता दिली आहे.  

भोपाळमधील एका वकीलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात एक दाम्पत्य राहते. यात पतीने आपले वैवाहिक स्टेटसला बदलून टाकायचा निर्णय घेतला. दोघेही तीन वर्ष विवाह बंधनात असतानाही त्यांनी धाडसी पाऊल उचलायचे ठरवले. भोपाळमध्ये त्याची मैत्रिण राहते. तिच्याशीही विवाह रचण्याचा त्याने निर्णय पत्नीला बोलून दाखवला. मात्र, कायदेशीर दृष्ट्या ते शक्य नसल्याने पत्नीनेच अधिक समजूत दाखवत त्याच्याबरोबर घटस्फोट घेऊन मैत्रिणीबरोबर विवाह सुद्धा लावून देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेऊन या दाम्पत्याने एक नवीन आदर्श घालून दिला असे वकीलांचे म्हणणे आहे.       

संबंधित बातम्या