गुलाब चहाचे दोन घोट करणार जादू...चेहऱ्यावर येणार चमक आणि ....

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

गातील सर्वात जुन्या आणि सुंदर फुलांपैकी एक फूल म्हणजे गुलाब. ज्याची फक्त सुगंधी फूलापर्यंत ओळख नाही तर या फूलाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आरोग्यशास्त्रात आहे. 

गातील सर्वात जुन्या आणि सुंदर फुलांपैकी एक फूल म्हणजे गुलाब. ज्याची फक्त सुगंधी फूलापर्यंत ओळख नाही तर या फूलाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आरोग्यशास्त्रात आहे. या फूलाचे बरेच प्रकार आहेत, जे मानवाच्या वापरासाठी सुरक्षित मानले जातात. हेच कारण आहे की गुलाब अनेक प्रकारे वापरला जातो एवढच नाही तर गुलाब खाण्यातही वापरला जातो. जसे की, गुलकंद, गुलाब शरबत, गुलाबजल; आणि आता तर गुलाबाच्या फूलापासून चहाही बनवला जातो. आरोग्यासाठी हा चहा अनेक प्रकारे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त,  हा चहा पिल्याने  आपली त्वचा चमकदार होते. चला तर जाणून घेवूया गुलाबच्या पाकळ्यापासून बनवलेल्या चहाचे फायदेच ते खालीलप्रमाणे....

गुलाबाच्या फुलांचा चहा कसा बनवायचा
प्रथम दोन कप पाणी गरम करा आणि त्यात गुलाबच्या पाकळ्या घाला. या पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करा. यानंतर हे पाणी एका कपात गाळून घ्या आता या चहा ला चव येण्यासाठी त्यात थोडेसे मध घाला. तुमचा गुलाब चहा रेडी....

पीरियड्सच्या वेदनापासून सुटका
जेनरिव्‍यूज प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की 2005 च्या अभ्यासानुसार, अंगात होणाऱ्या वेदना, जळजळ आणि शरीराच्या कुठल्याही भागावर येणारी सुजन या पासून आराम मिळण्यासाठी गुलाबाचा चहा अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.  पीरियड्समध्ये होणारा त्रास कमी करण्यास या चहाची मदत होवू शकतो.

नाक, घसाच्या आजारासाठी फायदेशीर
एक कप गुलाब चहा हा घश्यातील खवखव दुर करण्यास मदत करते. खोकला सर्दी आणि फ्लूच्या सामान्य लक्षणांवर परिणाम करणारा हा उपचार आहे. चहामध्ये असलेले व्हिटॅमिन सी जंतूंच्या होणाऱ्या संक्रमणास लढायला मदत करते आणि घशात होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करते.

पचनशक्ती वाढते
गुलाबच्या पाकळ्या आणि गुलाबाच्या फुलांपासून बनविलेले चहा पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते. गुलाब चहा आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरियाच्या वाढीस उत्तेजन देतो. बद्धकोष्ठतेसाठी हा चहा एक नैसर्गिक आणि हलक्या स्वरूपाचे पेय/ उपाय म्हणून देखील कार्य करते.

त्वचेसाठी फायदेशीर

गुलाबाच्या फूलांमध्ये व्हिटॅमिन A आणि E भरपूर प्रमाणात असते. गुलाब चहा त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. आणि  चेहऱ्यावरील डार्क सर्कल कमी करण्यास मदत करते. गुलाबच्या पाकळ्यामध्ये व्हिटॅमिन C चा भरपूर स्रोत असते. जो आपल्या एंटिऑक्सिडेंट गुणधर्मांकरिता देखील ओळखला जातो. यात एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म देखील आहेत, जे चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यास मदत करते. वेबएमडीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हा गुलाब चहा जीवनसत्त्वे आणि एंटिऑक्सिडेंट्सचा उत्तम स्रोत आहे. हा चहा कॅफिन, साखर आणि कॅलरीफ्री आहे. या चहामध्ये व्हिटॅमिन E आणि C असते, जे आपली त्वचा चांगली ठेवण्यास, चमकदार आणि उठावदार करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या