Winter Care Tips: सर्दी- खोकला असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी या पदार्थांचे सेवन टाळावे
Winter Care Tips
Winter Care TipsDainik Gomantak

हिवाळ्यात (Winter) सर्दी आणि खोकल्यांचे प्रमाण वाढत आहे. पण कोरोना काळात सर्दी- खोकला होणे ही चिंतेची बाब आहे. कारण सर्दी (Cold) आणि खोकला हे कोरोना विषाणूचे सामान्य लक्षण आहे. त्यामुळे कोरोना (Corona) विषाणुपासून बचाव करण्यासाठी आरोग्याकडे (Health) लक्ष देणे गरजेचे आहे. (Corona Care Tips)

* मसालेदार पदार्थ

सर्दी आणि खोकला असेल तेव्हा मसालेदार पदार्थ खावेसे वाटते. पण मसालेदार पदार्थ खाल्याने खोकला वाढू शकतो. कारण यात व्हिनेगर किंवा मीठ (Salt) असते ज्यामुळे तुमचा घसा खवखवणे आणि सूज येवू शकते. यामुळे सर्दी किंवा खोकला असेल तर मसालेदार पदार्थ (Spicy Foods) खाणे टाळावे.

Winter Care Tips
Valentine's Week: गुलाबाचे आरोग्यदायी फायदे

प्रोसेस्ड फूड

प्रोसेस्ड फूडचे सेवन हिवाळ्यात आरोग्यासाठी (Health) हानिकारक ठरू शकते. सर्वच पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक नसतात पण ज्या पदार्थांमध्ये मीठ, साखर अधिक असते यामुळे आपले वजन वाढू शकते. यामुळे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकते. यामुळे सर्दी-खोकला असेल तर स्नॅक्स, शीतपेय , सॉसेस यासारख्या पदार्थापासून दूर राहायला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com