Healthy Food: त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक खावेत 'हे' पदार्थ

Healthy Food: या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
Healthy Food
Healthy FoodDainik Gomantak

Healthy Food: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही पदार्थांचा समावेश आहारात करावा. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील. ऑलिव्ह ऑइलमध्ये भरपूर व्हिटॅमिन-ए असते. ते तुम्ही सॅलेडमध्ये टाकून खाऊ शकता. अथवा तसचं घेऊन आपल्या स्किनवर लावा. त्वचेच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑइल खूप फायदेशीर ठरते. तसेच, एवोकॅडो एक अतिशय आरोग्यदायी फळ आहे. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास याची मदत होते.

एवोकॅडोमध्ये असणारे ग्लूटामाइन एमिनो एसिड तुमची त्वचा क्लिन ठेवण्याचे काम करते. या फळाचा शेक बनवून तुम्ही पिऊ शकता.

Healthy Food
Healthy FoodDainik Gomantak

तसेच,ग्रेपफ्रूट हे एक लिंबूवर्णीय फळ आहे. यात व्हिटामिन-सीचे प्रमाण जास्त असते. ग्रेपफ्रूट रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. या फळाचा (Fruit) शेक बनवून तुम्ही पिऊ शकता. या फळात एका प्रकारचे रसायन असते ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होते. तसेच, ब्रोकोली हा भाजीचा एक प्रकार आहे. ब्रोकोलीमध्ये व्हीटॅमिन ए आढळते. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते. तसेच डाग, पिंपल नाहीसे होतात.

Healthy Food
Holy Month of Margashirsha: पवित्र मार्गशीर्ष महिन्यात असे ठेवा आचरण; जाणून घ्या शास्त्र काय सांगतं

तसेच, गाजर हे हिवाळ्यात खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन-ए आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स असल्याने त्वचेसाठी ते फार पोषक ठरते. गाजरामध्ये लाइकोपीन असते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा हानीकारक सुर्यकिरणांपासून बचाव होतो. तसेच, पालकच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. तुम्हाला निरोगी त्वचा (Skin) पाहिजे असल्यास पालकच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

तसेच, बदामामध्ये व्हिटामिन-ईचे प्रमाण जास्त असते. बदाममध्ये असणारे ॲण्टी ऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवून संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यास मदत करतात. तसेच, ग्रीन टीमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स असल्याने त्वचेसाठी ते लाभदायी आहे. त्यामुळे ग्रीन टी अवश्यक प्यायला हवा. चेहऱ्यावरील सुरकुत्या यामुळे कमी होतात. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com