Winter Skin care tips: चमकदार त्वचेसाठी बीटचा करा असा वापर

हिवळ्यात कमी पाणी पिल्यास त्वचा निस्तेज दिसू लागते.
Winter Skin care tips: चमकदार त्वचेसाठी बीटचा करा असा वापर
Winter Skin care: चमकदार त्वचेसाठी बीटचा करा असा वापर Dainik Gomantak

हिवाळ्यात (winter) अनेकांची त्वचा कोरडी (Dry Skin) पडते. हिवाळ्यात त्वचेची चमक (Glowing Skin) टिकून ठवणे तसे कठीणच! खर तर आपण हिवाळ्यात कमी पाणी पितो, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) आणि त्वचेवर (Skin) त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. शरीर हायड्रेटेड नसल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मार्केटमधील (Market) स्कीन प्रॉडक्ट (Product) वापरण्याएवजी नैसर्गिक पद्धतींचा वापर करावा. यात बीट (Beet) आपल्या त्वचेसाठी (Skin) फायदेशीर ठरते. आज आम्ही तुम्हाला बीटचे फायदे सांगणार आहोत.

बीटचा रस

चेहऱ्यावर बीटचा रस लावल्याने चेहऱ्यावरची चमक टिकून राहते. यासाठी बीटचे बारीक काप करा आणि मिक्सरमध्ये टाकून रस काढून घ्यावे. हा रस 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. नंतर पाण्यानेस्वच्छ धुवावे.

बीट आणि दही

बीट आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्याला लावणे चांगले असते. यासाठी किसलेल्या बीटमध्ये दोन चमचे दही मिक्स करावे. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.

Winter Skin care: चमकदार त्वचेसाठी बीटचा करा असा वापर
Winter Diet Tips: या पदार्थांचा करावा समावेश

* बीट आणि एलोवेरा जेल

बीट आणि एलोवेरा जेलचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यांवरील चमक टिकून राहते. यासाठी बारीक केलेल्या बीटमध्ये एक चमचा एलोवेरा जेल टाकावे. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.

* बीट आणि नारळ तेल

हिवाळ्यात तुमची त्वचा जर खूप कोरडी पडत असेल तर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी बीटच्या रसामद्धे नारळ तेल मिक्स करून मसाज करावी. यामुळे त्वचेचा चमकदारपना टिकून राहण्यासाठी मदत होते.

* बीट आणि दूध

बिटचा रस काढून यात दूध मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे. यामुळे चेहऱ्यावरील चमक टिकून राहते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com