World Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं? जाणून घ्या

World Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं? जाणून घ्या
World Blood Donor Day 2021

World Blood Donor Day 2021​: जागतिक रक्तदान दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात आहे. हा दिवस लोकांना रक्तदानाबद्दल जागरूक करण्यासाठी सादरा केला जातो. आपल केलेलं रक्तदान एखाद्यास जीवनदान देऊ शकते आणि म्हणूनच त्याला 'महादान' म्हटलं जाते. परंतु रक्तदान करतांना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा ते त्रासांचे कारण बनू शकते. 

1. सर्व प्रथम, हे जाणून घ्या की केवळ निरोगी लोकच रक्तदान करू शकतात. म्हणूनच,  हे महत्वाचे आहे की आपण कोणत्याही प्रकारे निरोगी राहणे गरजेच आहे. कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त होऊ नये. यामुळेच रक्त देण्यापूर्वी रक्तदात्याची वैद्यकीय तपासणी देखील केली जाते. अनेक देशांमध्ये रक्तदात्यांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे हे देखील तपासले जाते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्यास त्याचे रक्त घेतले जात नाही.

2. हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे की एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात साधारणतः पाच लिटर रक्त असते. मात्र हे प्रमाण शरीराच्या वजनावर अवलंबून असते. रक्तदान करतांना आपल्या शरीरातून सुमारे 450 मिली रक्त काढले जाते आणि निरोगी मानवी शरीरात, 24 ते 48 तासांत हे रक्त पुन्हा तयार होते. भारतात पुरुष तीन महिन्यातून एकदा आणि स्त्रियांना चार महिन्यातून एकदाच रक्तदान करू शकतात.

3. एचआयव्ही (एड्स विषाणू), हिपॅटायटीस, सिफलिस, टीबी ग्रस्त लोक रक्तदान करू शकत नाहीत. आपल्याला एखाद्या संसर्ग झाला असेल तर रक्त देण्याच्या किमान 14 दिवस आधी आपण त्यापासून पूर्णपणे बरे होणे गरजेचे आहे. सेक्स वर्कर्स ला रक्त देण्यास मनाई आहे.

4. रक्त देताना, एका इंजेक्शनचा वापर एकचदा झाला आहे की नाही हे पडताळणे गरजेचे आहे. एकदा एका व्यक्तीला टोचलेल्या इंजेक्शनचा वापर पुन्हा होता कामा नये.अन्यथा यामुळे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

5. रक्त देण्यापूर्वी आणि नंतर धूम्रपान करणे टाळा. रक्तदात्याने रक्तदान करण्यापूर्वी सुमारे 24 तास बिडी किंवा सिगारेट पिलेले नसावे. रक्तदान केल्यानंतरही तीन तासांनी तुम्ही धूम्रपान करणे कायमचे सोडून दिले तर आपल्याच आरोग्यासाठी चांगले आहे.

6. धूम्रपान करण्याबरोबरच रक्तदात्याने काही काळ मद्यपान करणे देखील टाळले पाहिजे. रक्त देण्यापूर्वी 48 तास मद्यपान करू नका. आपण हे केल्यास, अल्कोहोल आपल्या रक्ताद्वारे इतरांच्या शरीरात पोहोचू शकते, ज्यामुळे त्यांना हानी पोहोचवू शकते.

7. रक्तदान करण्यापूर्वी टॅटू किंवा अवयवांना इजा होणारे कृत्य करू नका. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, टॅटू काढल्यानंतर 6 तासांनंतर रक्तदान केले पाहिजे, तर अवयव छेदन केल्यास 12 तासांनंतरच रक्तदान केले पाहिजे.

8. जे लोकं दाताच्या समस्येने ग्रस्त आहेत त्यांना रक्तदान करण्यासठी थांबावे लागते. जर रक्तदात्याने दात संबंधित काही उपचार केले असतील तर त्यांनी 24 तासांनंतरच रक्तदान करावे.

9. नुकत्याच झालेल्या प्रसुतीनंतर किंवा गर्भपात झालेल्या, गर्भवती महिला यांनी त्वरित रक्तदान करू नये. यासाठी त्यांना एक वर्षापासून 6 महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यांच्या शरीरातील लोहाची तपासणी केल्यानंतरच रक्तदान करण्याचा सल्ला दिला जातो.

10. रक्तदान केल्यावर रक्तदात्यांना अशक्त वाटू शकते. अशा परिस्थितीत रक्तदान केल्यावर सुमारे तीन तासांनी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. गोड फळे किंवा फळांचा रस देखील आपण घेवू शकतो, ज्यामुळे आपल्याला त्वरित एनर्जी मिळते. रक्तदान केल्यावर लगेच जंक फूड खावू नका, जंक फूड आपल्या शरीरासाठी कधीही चांगले नसते आणि रक्तदान केल्यानंतर हे आपल्यासाठी अधिक समस्या निर्माण करू शकते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com