World Cancer Day 2021: महिलांसाठी घातक आहेत हे 3 कर्करोग

World Cancer Day 2021 These 3 cancers are fatal for women
World Cancer Day 2021 These 3 cancers are fatal for women

4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. काल आपण जागतिक कर्करोग दिन साजरा केला. कर्करोगाबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॅन्सर कंट्रोलने (यूआयसीसी) एक जागतिक पुढाकार घेतला आहे. डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते, सहापैकी एका व्यक्तीचा कर्करोगाने मृत्यू होतो. जगातील मृत्यूच्या संख्येस कर्करोग सुध्दा जबाबदार आहे. यावर्षी कर्करोग दिनाची थीम  'I am and I will' अशी आहे. कर्करोगाचे बरेच प्रकार आहेत. यापैकी कर्करोगाचे हे 3 प्रकार भारतीय महिलांमध्ये आढळतात. ते पुढीलप्रमाणे...

1़ ब्रेस्ट कॅन्सर (BREAST CANCER)
कर्करोगाचा हा प्रकार भारतातील स्त्रियांमध्ये सामान्य आहे आणि देशातील प्रत्येक 29 महिलांपैकी एकीला हा कर्करोग होतो. हा कर्करोग ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक आढळतो. आपण बराच काळ गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल. किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्याला आधी स्तनाचा कर्करोग झाला असेल. तर हा कर्करोग होवू शकतो. 

लक्षणे:
जर स्तनाला सामान्य गाठ असेल आणि त्याचा त्रास किंवा वेदना होत असेल, त्याच्या आकारात बदल झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 

उपचार:
मेमोग्राफी करून लहान गाठ ओळखता येते. एमआरआय टेस्ट करून स्तनाच्या कर्करोगाचा निदान लागू शकते.


2़ सर्वाइकल कैंसर (CERVICAL CANCER )
भारतीय स्त्रियांमध्ये 22.86 टक्के प्रकरणांमध्ये सर्वाइकल कैंसर  दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. शहरी महिलांच्या तुलनेत हा कर्करोग कर्करोग बहुधा ग्रामीण स्त्रियांमध्ये आढळतो. सर्वाइकल कैंसर कर्करोग बहुधा मानवी पेपिलोमा विषाणू किंवा एचपीव्हीमुळे होतो.

रिस्क फैक्टर:

  • अगदी लहान वयात (16 वर्षाखालील) लैंगिक संबंध ठेवणे.
  • एकापेक्षा जास्त लैंगिक पार्टनर
  • मानवी पॅपिलोमाव्हायरस संसर्ग (एचपीव्ही)
  • इम्यूनोसप्रेशन.
     

लक्षणे:
असामान्य रक्तस्त्राव, लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे आणि योनिमार्गात स्त्राव येणे

उपचार: 

  • एसिटिक एसिडचे निरिक्षण
  • आयोडीन (VILI) ची तपासणी
  • एचपीवी-डीएनए परीक्षण
  • कोलपोस्कोपी VI! ची तपासणी
  •  

3़ कोलोरेक्टल कैंसर (COLORECTAL CANCER):
हा कर्करोग कोलनपासून सुरू होतो आणि नंतर गुदाशयात पसरतो. ज्यामुळे कोलोरेक्टल कर्करोग होतो. हा कर्करोग 50 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांमध्ये आढळून येतो.

रिस्क फैक्टर:

  • तीव्र सर्दी ताप
  • कोलोरेक्टल कर्करोगाचा कौटुंबिक वारसा
  • धूम्रपान
  • चरबीयुक्त आहार.
  • क्रोहन रोग
  • उपचार:
  • स्टूल डीएनए टेस्ट
  • सीटी स्कॅन.

ग्रामीण असो वा शहरी भागातील महिला आपल्या आरोग्याच्या काळजीच्या बाबतीत नेहमीच निष्काळजीपणा करतांना दिसून येतात. तेव्हा महिलांनी आपल्या कुटूंबासोबत स्वत:ची काळजी घेण गरजेचं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com