World Happiness Day 2021: आंतरराष्ट्रीय आनंददिनाचा इतिहास वाचून तु्म्हीही व्हाल 'हॅप्पी'

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

2013 मध्ये प्रथमच भूतानमध्ये जागतिक आनंद दिवस साजरा करण्यात आला.

(World Happiness Day 2021 World Happiness Day 2021 You too will be happy by reading the history of International Happiness Day) दरवर्षी 20 मार्च हा दिवस 'आंतरराष्ट्रीय आनंद दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा करण्याचा ठराव जाहीर केल्यानंतर प्रथमच 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा करण्यात आला.  लोकांना आनंदाबद्दल जागरूक करणे, त्याचबरोबर निरोगी राहणे हा या आनंद दिवसाचा मुख्य उद्देश असणार आहे. 'सर्वांसाठी आनंद' ही यावर्षीच्या आनंद दिवसाची थीम आहे.

भारतातही या आंतरराष्ट्रीय आनंद दिवसाबद्दल सविस्तर जाणून घेऊया, लोकांना आनंदाबद्दल जागरूक करणे, निरोगी रहाणे हा या आनंद दिवसाबद्दलचा  मुख्य हेतू असतो. यावर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचा विषय 'सर्वांसाठी आनंद, कायमचा' म्हणजे सर्वजण नेहमी आनंद राहावं' आहे. व भारतातही  आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 12 जुलै 2012 रोजी एक ठराव मंजूर केला होता. 2013 मध्ये प्रथमच भूतानमध्ये जागतिक आनंद दिवस साजरा करण्यात आला. यानंतर जगभरात आंतरराष्ट्रीय आनंद दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. (World Happiness Day 2021 World Happiness Day 2021 You too will be happy by reading the history of International Happiness Day)

भूतानमध्ये आंतरराष्ट्रीय आनंद दिवस हा  'राष्ट्रीय सुट्टीचा दिवस' म्हणून ओळखला जातो, जेणेकरून लोक आपल्या कुटुंबासोबत राहू शकतील आणि आनंदाचा क्षण व्यतीत शकतील. भूतानमधील लोक उत्पन्नापेक्षा आनंदाला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय सन 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघानेही गरीबी आणि विषमता निर्मूलन करण्याचा संकल्प केला होता. आजकालच्या लोकांना तणावग्रस्त जगण्याची सवय झाली आहे. लोकांना येणाऱ्या सततच्या तणावाचा परिणाम त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे. आणि त्याचे रुपांतर मानसिक विकृतीत होत आहे. या परिस्थितीत ती व्यक्ती काल्पनिक जगात जगू लागते. या विकृतीवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस लोकांना आनंदी राहण्यासाठी जागरूक करतो. आज लोकांनी धावपळीच्या जीवनातील काही वेळ आपल्या कुटुंबासमवेत घालवावा हाच आनंदी दिवसाबद्दलचा आपला संकल्प असणार आहे.

संबंधित बातम्या