World Laughter Day: लाफ्टर डेचा इतिहास आणि हसण्याचे 5 फायदे; जाणून घ्या

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

आज जागतिक लाफ्टर डे आहे. दरवर्षी हा दिवस मेच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. कोरोना विषाणूमुळे, लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले आहे.

आज जागतिक लाफ्टर डे आहे. दरवर्षी हा दिवस मेच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. कोरोना विषाणूमुळे, लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ लाफ्टर डेच्या बहाण्याने का होईना लोकांच्या चेहऱ्या थोडेसे हास्य उमटेल. स्वत: हसा आणि या खास दिवशी इतरांनाही हसवा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, आपण सर्वांनी आपल्या घरी राहिले पाहिजे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण केले पाहिजे. परंतु या कठीण काळात निराश होण्याऐवजी दररोज 30 मिनिटे लाफ्टर योगा करा. हा योगा केल्यास तुम्ही सकारात्मक रहाल, आणि आपण तणावापासूनही दूर रहाल हसण्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते. (World Laughter Day: History of Laughter Day and 5 Benefits of Laughter)

उन्हाळ्यात गर्मीपासून पासून संरक्षण करणारे 'कैरी पन्ह' तसे बनवाल?...

'लाफ्टर डे' चा इतिहास
जागतिक लाफ्टर डे ची सुरुवात भारतापासून झाली आहे. याची सुरुवात योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली. 11 जानेवारी 1988 रोजी त्यांनी मुंबईत प्रथमच जागतिक लाफ्टर डे साजरा केला. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांचा ताण कमी करणे. हा दिवस साजरा करण्याचा एकच उद्देश होता की काही काळ लोक त्यांचा त्रास विसरून हसतील.

'लाफ्टर डे'चे महत्व 
या दिवसाचे महत्त्व म्हणजे लोकांना हसवणे आहे. माध्यम काहीही असो. हसणे हा एक चांगला व्यायाम आहे. असे केल्याने आपण तणावापासून दूर राहतो. त्याचबरोबर, जे लोक हसी मजाक करतात त्यांचे आरोग्य चांगले राहते.

हसण्याचे फायदे
1. हसण्याचे बरेच फायदे आहेत. हसण्याने केवळ आपला चेहराच व्यायाम होत नाही तर ताण आणि नैराश्य देखील कमी होते.

2. कोरोना युगात आपण सर्वजण कुठेतरी तरी तणावाशी झगडत आहोत. अशा परिस्थितीत आपण हसणे महत्वाचे आहे. हसण्याने तुमचे हृदय तरुण आणि निरोगी राहते. तुम्ही हे म्हणणे ऐकले असेलच की जो जास्त हसतो तो जास्त दिवस जगतो.

3. हसण्याने शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. खरं तर, हसताना आपण दीर्घ श्वास घेतो. यामुळे शरीरात ऑक्सिजन वाढतो आणि ब्लड सर्कुलेशन चांगले राहते. 

4. लाफिंग थेरपी आणि योगा सकाळी केले पाहिजेत असेही डॉक्टर म्हणतात. हे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करतात.

5. हसण्यास बेस्ट थेरपी म्हणतात. दररोज 10 मिनिटे खुलेपणाने हसले तर, आपण 20 ते 30 कॅलरी बर्न करता. तसेच आपला ताण देखील गायब होतो.

Health: अननसाचा रस पिण्याचे 5 खास फायदे; जाणून घ्या सविस्तर

संबंधित बातम्या