World Mental Health Day: उत्तम मानसिक आरोग्यासाठी 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने स्ट्रेस, डिप्रेशन, एंजायटी, डिमेंशिया, फोबिया यासारख्या समस्या उद्भवतात.
World Mental Health Day
World Mental Health DayDainik Gomantak

Mental Health: शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्वाचे आहे. म्हणूनच Sound Mind in Sound Body असं वारंवार सांगितले जाते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात क्षणिक आनंदाचा हव्यास वाढला असून, त्यातून होणारा भ्रमनिरास आणि अपेक्षाभंग यामुळे अनेकांना विविध मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने स्ट्रेस, डिप्रेशन, एंजायटी, डिमेंशिया, फोबिया यासारख्या समस्या उद्भवतात. (World Mental Health Day 2022)

10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्याचे महत्त्व जगाला पटवून देणे आणि याबाबत जनजागृती करणे या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी या दिवशी वेगळी थीम ठेवली जाते, यावर्षी 'मानसिक आरोग्य आणि कल्याण सर्वांसाठी जागतिक प्राधान्य' ही थीम निश्चित करण्यात आली आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

World Mental Health Day
Goa Politics : गोव्याचे राजकारण पुढे कोणत्या दिशेने जाणार?

व्यक्त व्हा, एकटे राहू नका- अनेक छोट्या करणांनी काहीजण नाराज होतात, त्याचा नकळत ताण येतो आणि मग लोक एकटे राहू लागतात. त्रास होणाऱ्या गोष्टी कुणाजवळ तरी व्यक्त होणं कधीही चांगले. त्यामुळे मन हालके होते आणि आधार वाटतो. त्याउलट एकटे राहिल्यामुळे अनेक नकारात्मक विचार मनात येतात. नेहमी कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.

चांगले मित्र बनवा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा - A friend in need is a friend indeed चांगले मित्र नेहमी आपल्याला आधार आणि योग्य मार्ग दाखविण्याचे काम करतात. त्यासाठी थोडे असले तरी चालतील पण, योग्य आणि चांगले मित्र असणे अतिशय आवश्यक आहे. तसेच, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कारण अशी लोकं तुमचे मनोबल वाढवण्या ऐवजी कमी करतात. तेव्हा अशा लोकांपासून दूर राहणे कधीही उत्तम.

आहार आणि झोपेची काळजी घ्या- जसा आहार तसा विहार असे आपले जुने जाणते लोकं म्हणतात. याकडे आपण फक्त ऐकूण दुर्लेक्ष करतो. पण, आपल्या शरिरासह मानसिक आरोग्यासाठी देखी आपला आहार योग्य आणि उत्तम असणं अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या आहाराची काळजी घ्या. तसेच, झोपेचे महत्व सर्वच वैद्यकीय तज्ञ सांगतात. त्यामुळे सात ते आठ तासांची शांत झोप तुमचा मूड फ्रेश करते.

योग आणि ध्यान करा - भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे योग आहे. योगाचे महत्व सर्व जगाने स्विकारले आहे. मन:शांती आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित योग आणि ध्यानधारणा खूप महत्वाची आहे. दररोज 10 ते 15 मिनिटांचा वेळ काढून योग आणि ध्यान करा त्याचा तुमच्या मानसिक आरोग्याला फायदा होईल.

World Mental Health Day
Blog: आणखी एक जवळचा मित्र गेला...

छंद जोपासा, मनाला आनंद देणार्‍या गोष्टी करा- प्रत्येकाला काही ना काही छंद किंवा आवड असते. आपण आयुष्यात जसंजसं पुढे जोतो तसं आपले छंद मागे पडत जातात. मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी किंवा आपले छंद नेहमी जिवंत ठेवा. आपण Creative आणि कलात्मक गोष्टीत रमल्यामुळे मन उत्साही राहते.

वर्षातून एकदा मानसिक आरोग्य तपासणी करून घ्या- आपण महत्वाचे नाही म्हणून ज्याकडे दुर्लेक्ष करतो त्या मानसिक आरोग्याची वर्षातून एकदा तपासणी करून घ्या. डॉक्टरांनी दिलेले वैद्यकीय सल्ले आणि उपचार यांचे काटेकोर पालन करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com