World Pneumonia Day 2021: निमोनियावर 'हे' उपाय गुणकारी

निमोनिया या आजारावर वेळेवर उपाय न केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
World Pneumonia Day 2021: निमोनियावर 'हे' उपाय  गुणकारी
World Pneumonia Day 2021: निमोनियावर हे उपाय आहेत गुणकारी Dainik Gomantak

निमोनिया (Pneumonia) हा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार खोकला, सर्दी यातून पसरतो. या आजारवर वेळेवर उपचार न केल्यास गंभीर स्वरूप घेऊ शकतो. निमोनिया हा आजार ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) कमी असते ते लोक या आजाराला बळी पडतात. दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस 12 नोव्हेंबरला साजरा केला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत निमोनियावर मात करण्यासाठी काही घरगुती उपाय.

* हळद

हळद ही प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच. हळदीमध्ये अॅंटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. त्यांचे सेवन केल्यास पित्त कमी होते. रोज सकाळी कोमट पाण्यात हळद आणि आले उकळून घ्यावे. त्यात थोडे मीठ घालून सेवन करावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो. हिवाळ्यात हळदीचे सेवन करणे आरोगीसाठी चांगले असते.

* तुळस

तुळशीचे रोप प्रत्येकांच्या घरी असतेच. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटी-बॅक्टेरियल घटक असतात. यामुळे सर्दी, खोकला यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. नियमितपणे एक कप पाणी घेवून त्यात तुळशीचे काही पाने टाकून उकळून घ्यावे. त्यात एक चमचा काळी मिरी पावडर आणि आल टाकावे. हे पाणी गाळून घ्यावे. या पेयाचे नियमित सेवन केल्याने निमोनियापासून बचाव होतो.

World Pneumonia Day 2021: निमोनियावर हे उपाय आहेत गुणकारी
Medicinal Plants या घरात असल्याच पाहिजेत

* मध

मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी आल कोमट पाण्यात उकळून घ्यावे. यात थोडे लिंबू आणि मध मिक्स करावे. हे पाणी गाळून याचे सेवन करावे. निमोनियामुळे होणार खोकला आणि सर्दी कमी होण्यास मदत मिळते.

* हे उपाय देखील करावे

  • सर्दी किंवा खोकला झाल्यास कोमट पाण्यात मीठ घालून गार्गल करावे. यामुळे घसा खवखवणे किंवा निमोनियामुळे होणारा खोकला कमी होतो.

  • ही समस्या वाढू नये यासाठी तुम्ही वाफ देखील घेवू शकता. आजकाल मार्केटमध्ये स्टीमर्स उपलब्ध आहेत. यात् पाणी भरून आरामात वाफ घेता येते. या पाण्यात निलगिरीचे तेल टाकून वाफ घेतल्यास लवकर आराम मिळतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com