Sanskrit Day: जगातील सर्वात प्राचीन भाषा 'संस्कृत' चा जाणून घ्या इतिहास एका क्लिकवर

World Sanskrit Day 2022: संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, भाषा मानली जाते.
Sanskrit Day 2022
Sanskrit Day 2022Dainik Gomantak

हिंदू दिनदर्शिकेनुसार संस्कृत दिवस आज साजरा केला जातो. जागतिक संस्कृत दिन (World Sanskrit Day 2022) हा विश्वसंस्कृत दिनम् म्हणूनही ओळखला जातो. संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे. ही भाषा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते.

* प्राचीन भारतीय भाषा

संस्कृत दिन हा संस्कृत या प्राचीन भारतीय भाषेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संस्कृत भाषेबद्दल ठिकठिकाणी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. या दिवसाचा उद्देश संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन करणे आणि तिचं संवर्धन करणे असा आहे. संस्कृत भाषेला उत्तराखंडची दुसरी अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. संस्कृत भाषा ही जगभरात वापरली जाणारी भाषा आहे. त्यानुसार संस्कृत भाषेत सुमारे 102 अब्ज 78 कोटी 5 दशलक्ष शब्दांचा शब्दसंग्रह आहे.

Sanskrit Day 2022
Corona Prevention: केवळ औषधेच नाही तर ताप आल्यावर 'या' गोष्टींची घ्या काळजी

जागतिक संस्कृत दिन भारतात (India) प्रथम 1969 मध्ये साजरा करण्यात आला. संस्कृत भाषेविषयी जागरूकता पसरवण्यासाठी तसेच या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषेला भारताच्या समृद्ध संस्कृतीचे हे वैशिष्ट्य मानले जाते.

संस्कृत दिनानिमित्त विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांचं आयोजन केले जाते. त्यामध्ये संस्कृत भाषेचे महत्व, त्याचा प्रभाव आणि या भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा केली जाते. हिंदू संस्कृतीत पूजा आणि मंत्रांचा जप संस्कृतमध्ये केला जातो.

संस्कृत भाषेचा उगम भारतात सुमारे 3500 वर्षांपूर्वी झाला असे मानले जाते. संस्कृत भाषेला देव वाणी अर्थात देवाची भाषा असेही म्हणतात. संस्कृत भाषेची मुळे इसवी सन पूर्व 2000 पर्यंत जातात.

* संस्कृत दिनाचे महत्व

प्राचीन भारतीय भाषा संस्कृत विषयी जागृती करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासह पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्कृत दिन साजरा केला जातो. संस्कृत भाषा शिकण्याचे आणि जाणून घेण्याचे महत्त्व या दिवशी सांगितले जाते. संस्कृत ही भारतीय भाषांची जननी समजली जाते. भारतात बोलल्या जाणाऱ्या प्राचीन भाषांपैकी ती पहिली असल्याची सांगण्यात येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com