World Sleep Day 2021: जाणून घ्या जागतिक झोप दिवसाची थीम

World Sleep Day 2021 The theme of World Sleep Day is Regular Sleep Healthy Future
World Sleep Day 2021 The theme of World Sleep Day is Regular Sleep Healthy Future

World Sleep Day 2021: निरोगी राहण्यासाठी, चांगली झोप घेणे फार महत्वाचे आहे. आजकालच्या व्यस्त रुटीनमुळे बहुतेक लोक आठ तासांची झोपही पूर्ण करू शकत नाहीत. बदलत्या दिनचर्या आणि तणावामुळे बरेच लोक निद्रानाशा च्या समस्ये सोबतही जगाव लागतं.

झोप पूर्ण होत नाही तेव्हा माणसाला कोणतीही कामे योग्य प्रकारे करता येत नाहीत.  झोपेचे महत्त्व सांगण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक स्लीप डे आयोजित केला जातो. यावर्षी जागतिक झोपे दिन 19 मार्च रोजी साजरा केला जात आहे. या तारखेमध्ये बदल देखील केले जातात, परंतु हा दिवस केवळ मार्चमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जागतिक झोपे दिवसाची थीम - 

जागतिक झोपेच्या दिवसाची थीम - 'नियमित झोप, निरोगी भविष्य' अशी आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या सर्वांना नियमित झोप घेणे आवश्यक आहे जेणेकरुन आपण निरोगी भविष्याची कल्पना करू शकाल. जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर आपली कार्यक्षमता आणि आरोग्यावर दिवसागणिक परिणाम होईल, म्हणून सर्व लोकांनी झोपेची काळजी घेणे गरजेचं आहे आणि झोपेला संपूर्ण आठ तासांचा वेळ देणे गरजेचं आहे म्हणून या दिवसाची ही थीम निवडली गेली आहे.

निद्रानाश- एक गंभीर समस्या-

लोकांना वाटते की झोपेची समस्या ही एक सामान्य समस्या आहे परंतु ही दिवसेंदिवस एक गंभीर समस्या बनत चालली आहे. बरेच लोक या समस्येने त्रस्त आहेत. पूर्वी ही समस्या फक्त वयोवृद्धांमध्येच दिसून येत होती, परंतु आजकाल तरूणांमध्ये देखील हि समस्या दिसून येत आहे, या निद्रानाशाच्या समस्येस बदलती जिवलशैली, दिनक्रम आणि मोबाईल सर्वात जबाबदार आहेत. 

चांगल्या झोपेसाठी हे उपाय करा-

जर तुम्हाला रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर झोपण्याच्या एक तासापूर्वी मोबाइल फोन बंद करा. रात्री जास्त मसालेदार अन्न खाऊ नका. झोपायच्या वेळ आधी कोणाशीही वाद घालू नका किंवा नकारात्मक बोलू नका. झोपायचा बेड आणि उशी आरामदायक असल्याची खात्री करा. झोपताना डोळसपणे चांगल्या आठवणींचे स्मरण करा. 

झोपेबद्दल स्वारस्यपूर्ण तथ्ये-

15 टक्के लोकांना झोपेत चालण्याची बिमारी आहे आणि 5 टक्के लोकांना झोपेत बोलण्याची बिमारी आहे. 

जेव्हा आपण खूप आनंदी होतो, तेव्हा आपली झोप उडून जाते. अशा यवेळी, अगदी कमी झोपसुद्धा पुरेशी असते.

1964 मध्ये 17 वर्षीय रैंडी गार्डनरने 264 तास आणि 12 मिनिटे जागे राहण्याचा विक्रम तयार केला, जो 54 वर्षांनंतर अजूनही कायम आहे.

https://youtu.be/BbQ4T4Pb7u0

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com