World Sparrow Day 2021: एक नजर चिमण्यांच्या जगात 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

दरवर्षी 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.  ह्या छोट्या पक्षाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि सामान्य घरातील चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी  हा दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड स्पॅरो डे 2021 ची थीम “आय लव स्पॅरो” अशी आहे. 

 

World Sparrow Day 2021: दरवर्षी 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.  ह्या छोट्या पक्षाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि सामान्य घरातील चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी  हा दिवस साजरा केला जातो. लहान चोच हिरवळ, तपकिरी, पंख असलेला पक्षी पाहून मन आनंदित होऊन जाते. पण आता सध्या  या लहानग्या जीवाचे संरक्षण करणे फार गरजेचे झाले आहे.  

आता वाढलेल्या कॉक्रिटीकरणामुळे,जंगलतोड आणि प्रदुषणामुळे चिमण्या इतक्या सामान्यपणे आपल्याला पाहायला मिळत नाहीत. यामुळेच इको-सिझन ऍक्शन फाउंडेशन (फ्रान्स) आणि जगभरातील इतर असंख्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने 'नेचर फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडिया'ने जागतिक स्पॅरो डे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

जागतिक चिमणी दिन: इतिहास आणि महत्त्व 

नेचर फॉरेव्हर सोसायटीची सुरूवात मोहम्मद दिलावर या भारतीय संरक्षकांनी केली होती. त्यांनी महाराष्ट्रातील  नाशिकमध्ये सुरुवातीला घरातचचिमण्यांना मदत करण्यास सुरवात केली आणि  पुढे जाऊन त्यांच्या या चांगल्या कामानिमित्त त्यांना  2008 साली "पर्यावरणातील ध्येयवादी नायक" म्हणून गॊरविले गेले. नेचर फॉरेव्हर सोसायटीच्या कार्यालयात एक अनौपचारिक चर्चेदरम्यान वर्ल्ड स्पॅरो डे म्हणून चिन्हांकित करण्याची कल्पना समोर आली. 2010 मध्ये जगातील विविध भागात पहिला जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. हा दिवस कला, स्पर्धा, जागृती मोहिम आणि चिमण्या मिरवणुका तसेच माध्यमांशी संवाद यासारख्या विविध प्रकारच्या उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला होता ..

जागतिक स्पॅरो डे: थीम
वर्ल्ड स्पॅरो डे 2021 ची थीम “आय लव स्पॅरो” अशी आहे. 

काही मनोरंजक गोष्टी
सामान्य नाव: House sparrow
वैज्ञानिक नाव: Passer domesticus
उंची: 16 सेंटीमीटर
विंगस्पॅन: 21 सेंटीमीटर
वजन: 25-40 ग्रॅम
प्रकार : 15

जागतिक स्पॅरो डे

कश्या प्रकारे साजरा करता येईल सहसा चिमण्या घरच्या मागील अंगणांत किंवा हिरवव्यागार झाडंच्या मोठ्या झुडपांमध्ये राहतात
गेल्या दोन दशकांत त्यांची संख्या जवळजवळ प्रत्येक शहरात कमी होत आहे. चला या जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी मुले आणि आपल्या आसपासच्या इतरांना चिमण्यांसाठी असलेल्या जागांचा आदर करण्यास सांगूया. 

चिमण्याच्या अनुकूल सवयी विकसित करणे

लहान  मुलांना चिमण्यांना बघण्यासाठी बाल्कनीमध्ये एका भांड्यात पाणी आणि धान्य ठेवण्यास शिकवणे तसेच घराच्या आसपास हिरवीगार झाडे लावणे, ज्यामुळे चिमण्या आपल्याला वारंवार त्यांना बघता येईल त्यांना भेटता येईल. 

फॅन्सी ड्रेस स्पर्धा

आपल्या मुलांना चिमणी, मैना, कबूतर, कावळा आणि पॅराकीट्स सारख्या सामान्य पक्ष्यांसारखे कपडे घालू द्या आणि त्यांच्यापैकी एका छान ड्रेस परिधान करून आलेल्या मुलांना बक्षीस द्या. त्यांचा उत्साह वाढवा.

मुलांबरोबर स्पॅरो वॉकसाठी जा

घराशेजारील गार्डन, तळ, झाडाझुडपाचे रस्ते असलेल्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जा. आज शनिवार असल्याने स्थानिक स्पॅरो वॉकला जा. दुर्बिणी आणि कॅमेरे घेणे विसरू नका जेणेकरून लहानांच्या मनात पक्षीप्रेम जागे होईल. 

चिमण्यांचे पोस्टर्स बनवा

चिमण्या आणि इतर पक्ष्यांचे पोस्टर आणि चित्रे काढा  आणि ते तुमच्या बाल्कनीमध्ये लावा जेणेकरून ते तुम्हाला रोज दिसतील.

आपला खास दिन चिमण्यांनी साजरा करा

 आपला किंवा आपल्या मुलांचा वाढदिवस किंवा कोणता वर्धापन दिन मार्च महिन्यात येत असल्यास, तो चिमण्यावर आधारित एका थीमद्वारे साजरा करा. चिमण्यांसाठी लहान रंगेबिरंगी घरटे बनवा व ते झाडाला लटकवा. ज्यामुळे या उन्हाळ्याच्या दिवसात चिमण्यांना आश्रयासाठी जागा मिळू शकेल.
 

संबंधित बातम्या