जगातील सर्वांत खोल 'डायविंग पुल' सुरू झालाय; याची खोली किती आहे? जाणून घ्या...

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

पोलंडमध्ये जगातील सर्वांत खोल डायविंग पुल नुकताच सुरू करण्यात आला. मसाक्झोनोवस्थित हा पुल १५० फूट खोल असून तो नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.

वर्सोव- पोलंडमध्ये जगातील सर्वांत खोल डायविंग पुल नुकताच सुरू करण्यात आला. मसाक्झोनोवस्थित हा पुल १५० फूट खोल असून तो नुकताच पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. याआधी जगातील सर्वाधिक खोल डायविंग पुलापेक्षा ५ मीटर जास्त खोल हा डायविंग पुल आहे. ८००० क्युबिक मीटर पाणी बसण्याची क्षमता असलेला हा पुल सामान्य पुलाच्या २०पट जास्त पाण्याचा साठा बसेल इतक्या क्षमतेचा आहे.    
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलंडमधील हा पुल बंद होता. मात्र, आता हा पुन्हा खुला होत असून डायवर्ससाठी येथे ट्रेनिंग सेंटर कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. याबरोबरच एका डायविंग बघण्यासाठी येणाऱ्यांना एका हॉटेलरूममधून सारे दृश्य बघता येणार आहे. डिपशॉटचे संचालक मायकेल यांनी सांगितले की, हा पुल अग्निशामक दल तसेच सैन्य दलालाही वापरता येणार असून त्यांनाही  नवनवीन प्रयोग करण्यासाठी येथे संधी आहे. हा पुल सर्वांसाठी आता खुला करण्यात आला आहे.  

अद्यापपर्यंत प्रस्थापित झालेल्या विक्रमांनुसार सर्वां खोल डायविंग पुलाचा विक्रम इटलीतील मोंटेग्रेटो टर्मच्या नावे आहे. तो ४२ मीटर खोल आहे. मात्र, नव्याने झालेला हा पुल बघण्यासाठी पहिल्याच दिवशी जवळपास डझनभर प्रेक्षकांनी गर्दी करत या पुलाला भेट दिली.        
 

संबंधित बातम्या