Yoga Day 2022: 'हे' योगासनं करा अन् मिळवा रागावर नियंत्रण

Yoga Day 2022: ज्या लोकांना रागाच्या समस्येला सामोरे जावे लागते त्यांनी नियमितपणे योगासनं करावी.
Yoga Day 2022: 'हे' योगासनं करा अन् मिळवा रागावर नियंत्रण
Yoga Day 2022 | Anger Control Through YogaDainik Gomantak

अनेकांचा स्वभाव हा चिडचिडा असतो. तर अनेकांचे रागावर नियंत्रण राहत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होउ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही योगासनं करु शकता. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती योगासनं करायला पाहिजे हे जाणुन घेउया. (Yoga Day 2022 yoga anger control read must)

* बालासन (balasana)
नियमित बालासन केल्याने मन शांत राहतं. तसेच बलासनामुळे भावना नियंत्रणात ठेवता येतात. नकारात्मकत भावना देखील तुमच्यामध्ये तयार होत नाही. नियमितपणे हे आसन केल्यानं तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवता येईल.

असे करा बालासन (How to do Balasana Yoga)
वज्रासनात योगा मॅटवर बसा.
हळू श्वास घ्या आणि हात डोक्याच्या वरच्या बाजूला वर न्या.
हळूहळू श्वास सोडा आणि पुढे वाकून कपाळ जमिनीवर ठेवा.
हे करताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
हे 30 सेकंद करा.

Balasan
BalasanDainik Gomantak
Yoga Day 2022 | Anger Control Through Yoga
International Yoga Day: हे 7 आसने करून वजन करा कमी

* मत्स्यासन (Matsyasana)
मत्स्यासन केल्यानं तुमच्या शरिरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत मिळते. तसेच तणाव कमी होतो. त्यामुळे चिडचिड देखील कमी होते.

* असे करा मत्स्यासन
मत्स्यासन करण्यासाठी प्रथम पद्मासनामध्ये बसा. त्यानंतर पाठीवर झोपा. त्यानंतर मस्तक आणि धड हे वाकवा. ज्यामुळे पाठीची कमान होईल.

Matsyasana
MatsyasanaDainik Gomantak

* यंदाची थिम

मन की बात या कार्यक्रमाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा-डे ची यंदाची थिम सांगितली. ते म्हणाले, "21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. या 'योग दिवसाची संकल्पना (Theme) आहे - “मानवतेसाठी योग”.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com