Yoga Mantra: ग्लोइंग स्किनसाठी 'या' योगासनांचे आजच रुटीनमध्ये करा समावेश

प्रत्येक मुलीचे ग्लोइंग स्किनचे स्वप्न असते.
yoga mantra
yoga mantraDainik Gomantak

Yoga For Glowing Skin: महिला असो वा पुरुष सुंदर चमकणारी त्वचा हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध अनेक ब्युटी प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्स वापरतात.

त्यामुळे अनेक वेळा चेहऱ्यावर दुष्परिणामही दिसून येतात. तुमच्यासोबतही असेच काही घडले असेल तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट्स सोडा आणि या योगासनांची (Yoga) मदत घ्यावी. या योगासनांमुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक कायम राहिल.

  • भुजंगासन

भुजंगासन छाती उघडून शरीरातील थकवा कमी करण्यास मदत करते. हा योगा केल्याने शरीराला अतिरिक्त ऑक्सिजन मिळण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे त्वचा (Skin) चमकते.

  • उष्ट्रासन

याला कॅमल पोझ असे देखील म्हणतात. हे करताना व्यक्तीला पूर्णपणे मागे वाकावे लागते. हे आसन तुमची बरगडी उघडून तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यास मदत करते. केस (Hair) गळतीच्या समस्येपासून आराम मिळण्यासोबतच या योगाच्या सरावाने तणावाची पातळीही कमी होते. त्यामुळे व्यक्तीची त्वचा चमकते.

yoga mantra
Paneer Salad Recipe : हिवाळ्यात खा पनीर सलाड; जाणून घ्या सोपी रेसिपी
  • मत्स्यासन

हा योगा तुमच्या घशाच्या आणि चेहऱ्याच्या (Face) स्नायूंना टोन करते आणि तुमच्या त्वचेला एक अद्भुत चमक आणते. याशिवाय हार्मोन्स सामान्य करण्यासाठी मत्स्यासन खूप फायदेशीर आहे.

  • हलासन

हा योगा केल्याने संपूर्ण शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारते. तणाव कमी करून, हे आसन झोपेशी संबंधित समस्या सोडवण्यास देखील मदत करते. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि ती दिसायला चमकदार बनते.

  • त्रिकोनासन

हा योगा तुमचे मन आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि हात आणि पाय कडक आणि मजबूत ठेवण्यास देखील मदत करते. हे आसन केल्याने ताजेपणा अनुभवता येतो आणि चमकदार त्वचेचे स्वप्नही पूर्ण होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com