Beauty Tips: बर्फाचा करू शकता तुम्ही असाही वापर 

You can also use ice like this
You can also use ice like this

उन्हाळा म्हटल की आइसक्रीम, कोल्डड्रिंक, इत्यादि  थंड पदार्थ  खाण्या-पिण्याची मजा असते. उन्हाळा सुरू झाला की या सर्वांची आठवण येते. लहानपणी खाल्लेला आइस गोळयाची गंमतच वेगळी होती. मोठे झालो तरी ते दिवस आठवून आइस गोळा खावासा वाटतो. बर्फाचा वापर फक्त पाणी थंड करण्यासाठीच केला जातो असा आपला समज आहे. परंतु बर्फाचा अनेक गोष्टीसाठी उपयोग केला जातो. (You can also use ice like this)

बर्फाचे माहिती नसलेले उपयोग -

1) कडू औषध  खाण्याआधी तोंडामधे बर्फ ठेवल्याने औषध कडू लागणार नाही. 

2) शरीरावर कुठे जखम झाली असेल आणि त्या भागतून रक्त वाहने थांबत नसेल तर त्यावर बर्फ लावल्याने रक्त वाहने लगेच थांबते. 

3) पायांच्या टाचामधील दुखणे दूर करण्यास बर्फ फायदेशीर आहे.   

4) जास्त जेवण झाल्यावर अपचन झाल्यासारखे वाटत असेल तर बर्फ खाल्याने पचनास मदत होते.   

5) उलटयाचा त्रास होत असेल तर बर्फ चोखावा, लगेच उलट्या येणे बंद होणार.    

बर्फाचे इतर फायदे-
उन्हाळ्यात अनेकाना घामोळ्याचा त्रास होतो. बर्फाने मसाज केल्याने शरीराचे तापमान कमी होऊन घामोळ्या कमी होतात. त्वचेवरील काळे डाग कमी करण्यासाठी बर्फाचा वापर केला जातो. चेहऱ्यावर बर्फ फिरवल्याने त्वचेवरील रक्तभिसरण वाढण्यास मदत होते. यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. नियमित बर्फाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील तेलकटपना तसेच 
डेड सेल्स (dead cells) कमी होतात. बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचेवरील बैक्टीरिया  (Bacteria) कमी होऊन पिंपल्स येणे कमी होतात. नियमित बर्फाने मसाज केल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहून त्वचा सॉफ्ट होते. बर्फाचे असे इतर फायदे फायदे देखील आहेत. वेळ न घालवत लगेच बर्फाचे हे उपयोग करून पहा. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com