कुडचडे-काकोडा पालिका क्षेत्रात रस्त्यावरील सांडपाण्यामुळे दुर्गंधी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

गटारात वाहणारे सांडपाणी नक्की कोणत्या इमारती मधून येते हे मात्र कळत नाही.एकंदरीत येथील परिस्थिती पाहिल्यास या बाजूने चालत जाणाऱ्यांना नाकावर हाथ ठेवावा लागतो तर गटारातून वाहणाऱ्या या पाण्यात किडे व मच्छरांचा पैदावास आढळून येतो हा प्रकार पंटेमळकडे जाणाऱ्या चार रस्ता सर्कल वरील आहे.पावसाळ्यातही हे गटार भरून वाहायचे पण नेमके इतके पाणी कुठून येते याचा अंदाज नसायचा पण आता पावसाळा नसतानाही अशा प्रकारे सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांनी हा प्रश्‍न लावून धरला आहे.

कुडचडे: कुडचडे काकोडा नगरपालिका क्षेत्रातील काही गटारातून इमारतीमधील मलजल वाहत असल्याचा प्रकार आढळून आला असून शिवाजी सर्कल पासून अवद्या अंतरावरिल लोटस प्लाझा समोरील गटारात असेच सांडपाणी वाहत आहे. व या पाण्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने पंटेमळ मार्ग जाणाऱ्या व येथे व्यवसाय करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याच गटारा शेजारी लोस प्लाझा इमारत आहे. त्यात बार, हॉटेल व फ्लॅट आहेत तर त्याच्या शेजारी खाजगी घरे आहेत पण नेमके हे सांडपाणी कुठून 'सोडले जाते याचा अंदाज मिळत नसल्याने येथील नागरिकांनी कुडचडे काकोडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाळकृष्ण होडरकर यांच्याकडे संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानी घालणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणच्या गटारांत अशा प्रकारे घाण सांडपाणी सोडण्याचा प्रकार घडला जात आहे.

मात्र त्यावर कोणाचेच लक्ष राहिलेले नाही तर या सांडपाण्यामुळे नाहक दुर्गंधी पसरत असल्याने रोगराईची भितीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरोग्य खात्याकडूनही अशा उघड्या गटारांत औषधी फवारा मारला जात नसल्याने या गटारात मच्छराचा पैदावास मोठ्या प्रमाणात आढळून आलेला असून हे चिंतेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले. वरील गटार हे उघड्यावर असून नेमके रहदारीच्या ठिकाणीच हे घाणेरडे सांडपाणी साठून राहिलेले आहे व त्यात किडे तयार झाल्याचे पहायला मिळते. नगरपालिका प्रशासनाने लवकरात यावर तोडगा काढून हे सांडपाणी कुठल्या इमारतींमधून वाहते याचा शोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्यांना त्यापासून आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असेही स्थानिकांनी सांगितले.

गोमंतकियांना १ फेब्रुवारीपासून कसिनो प्रवेश बंद

संबंधित बातम्या