नेरूलच्या सरपंचपदी रेश्‍मा कळंगुटकर यांची एकमताने निवड

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

कळंगुट:रेश्‍मा कळंगुटकर यांची नेरूलच्या सरपंचपदी निवड
साळगाव मतदारसंघातील नेरूल पंचायतीच्या सरपंचपदी रेश्‍मा संजय कळंगुटकर यांची एकमताने निवड करण्यात आली.माजी सरपंच पिएदाद आल्मेदा यांनी अडीच वर्षे यशस्वीरित्या कारभार सांभाळल्यानंतर अलिखीत करारानुसार आपल्या पदाचा त्याग केला होता.त्यानुसार आज शुक्रवारी पंचायत कार्यालयात घेतलेल्या बैठकीत रेश्‍मा कळंगुटकर यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.

यावेळी स्थानिक आमदार तथा माजी ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर, पंचायत सचिव गोविंद खलप तसेच इतर पंचायत सदस्य उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी या नात्याने बार्देश गटविकास कार्यालयातील अधिकारी मनोहर परवार यांनी काम पाहिले. दरम्यान, स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील विकास कामासाठी तत्पर राहाणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रेश्‍मा कळंगुटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या