दिगंबर कामत यांचा सावधगिरीचा इशारा

Digamber kamat
Digamber kamat

पणजी

कोविडची लागण झालेला सातवा रुग्ण बरा झाल्याने एकही कोरोनाग्रस्त आता गोव्यात राहिलेला नाही व गोवा सुरक्षित जरी असला तरी आपणाला कोरोनापासून मुक्ती मिळालेली नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. सामजिक चाचण्या सुरू केल्यानंतरच आपण सुरक्षित भागातून कोरोनामुक्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने पात्र ठरणार आहोत हे सरकारने ध्यानात ठेवावे, असा सल्ला विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे, की कोविड संकटाचा सामना करणारे वैद्यकीय पथक, स्वयंसेवक यांच्या अथक परिश्रमाला माझा सलाम. आपला जीव धोक्यात घालून इतरांना सुरक्षा देणाऱ्या या सर्व देवदूतांचे गोमंतकीय कायम ऋणी राहतील. गोमंतकीयांनी टाळेबंदीच्या काळात दाखवलेला संयम व शिस्तबद्द वागणूक  यासाठी ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत व यापुढे त्यानी असेच सहकार्य देणे अपेक्षित आहे. सरकारने आता तपासणी व चाचण्यांचा वेग वाढवणे गरजेचे असून, राज्याची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी उपाय योजना आखण्यासाठी योग्य पाऊले उचलावीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com