‘कांदे हॅड्‍स ऑफ काईंडनेस’तर्फे मळा मारुतीराय जत्रोत्सवात दालन

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजीः समाज कार्याच्या अनोख्या उपक्रमामुळे प्रसिध्दीस आलेल्या ‘कांदे हँडस् ऑफ काईंडनेस’ या मळा - पणजी येथील संस्थेने आता ४ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी मारुतीराय जत्रोत्सवातील दालनाच्या स्वरूपात येत आहे. जत्रोत्सवात हे दालन ब्रम्हकुमारी कार्यालयासमोर संध्याकाळी ७ नंतर खुले राहणार आहे.

या उपक्रमाची सुरवात मळा येथील सुरज कांदे आणि रेखा कांदे यांनी २०१६ साली केली. दात्यांनी दिलेल्या वस्तू गरजवंतांना पुरवणे हा त्यामागचा हेतू होता आणि गेली चार वर्षे त्यादृष्टीनेच हा आगळावेगळा उपक्रम पणजी बसस्थानक, मेरशी, पणजी मार्केट, १८ जून मार्ग व इतर ठिकाणीही सुरू आहे.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

या दालनात दैनंदिन जीवनातील उपयुक्त अशा वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. त्यात कपडे, भांडी, खेळणी, बूट, चपल, सोफासेट, लॅपटॉप, ज्युसर, डिव्हीडी प्लेअर, फ्रीज, मायक्रोसॉफ्ट ओव्हन आदी वस्तुंचा समावेश असतो.

असे हे लोकप्रिय दालन यंदा मारुतीराय जत्रोत्सवात ४ फेब्रुवारीपासून सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे. गरजुंनी एका दिवसात एकच वस्तू या दालनातून घ्यावी व परत दुसऱ्या दिवशी आवर्जुन यावे, असे या संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रेखा कांदे (९८२२५८८५४८) किंवा सुरज कांदे (९८२२४४४२६२) यांच्याकडे संपर्क करावा अथवा महेश आमोणकर, बादशहा शेख, शैलेंद्र पुजारी यांना भेटावे, असे कळविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या