टाळेबंदीच्या काळात फेसबुकवर गाजतेय काव्य होत्र

singing on facebook
singing on facebook

पणजी,

टाळेबंदी झाली आहे. देश संपूर्णपणे बंद आहे. सांस्कृतिक जगतात सामसूम आहे. सर्व वातानुकूलित सभागृहे कुलूपबंद झाली आहेत. राज्यभरातील नावाजलेल्या संस्थांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. मात्र, 'जे देखे न रवी ते देखे कवी' या उक्तीस अनुसरून गोमंतकीय कवी गप्प बसतील तर ते कवी कसले... मनसा  क्रिएशनकडून आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत  या टाळेबंदीच्या काळात फेसबुकवर काव्य होत्र हे ऑनलाइन काव्यसंमेलन सुरू झाले. शेकडो कवींनी या काव्यहोत्रात आपल्या काव्यांची आहुती दिली आहे.

त्याचे झाले असे की मनसा क्रिएशन या संस्थेच्या बॅनरखाली कवियत्री व पत्रकार कालिका बापट यांनी फेसबुकवरून एक आवाहन केले. कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादरीकरणाचे व्हिडिओ शेअर करावेत व कलिका बापट यांना टॅग करावेत. कविता संपताच प्रत्येकाने पुढील सादरीकरणांसाठी दोन कवी किंवा कवयित्रीची नावे सुचवावित. त्या कवींनी आपल्या कविता सादर कराव्यात व त्यांनीही दोन कवींची नावे सुचवावी. या आवाहनामुळे मागील तीन दिवसात शेकडो कवींनी आपल्या कविता सादर केल्या व त्यांच्या लाखो मित्रांनी त्या पाहिल्या, लाईक केल्या व शेअर केल्या. यामध्ये नवोदित कवींची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी प्रस्थापित कवींपासून नवख्या कवीपर्यंत सर्वांनी आपला सहभाग नोंदवला आहे.  

सध्या टाळेबंदीमुळे कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसले तरी घरी बसूनच या ऑनलाईन काव्यहोत्रामुळे प्रतिभावंतांना आपल्या प्रतिभेस फुलवता आले. शेकडो काव्य रसिकांनी नवनव्या कवितांचे सादरीकरण अनुभवता आले. यामध्ये पुढील कवी व कवयित्री सहभागी झाले होते. रधिका राजेंद्र नागवेकर,  विनय बापट, अंकिता देऊळकर,  कविता आमोणकर, अंजली आमोणकर, परेश नाईक, पौर्णिमा केरकर, आरती जोग,  दत्तप्रसाद जोग, नीता तोरणे, दीपा मिरिंगकर, चित्रा क्षीरगसागर, गझलकार प्रकाश क्षीरसागर, विद्या शिकरेकर, राजमोहन शेट्ये, नीशा गोरे, ॲड केतकी साळकर शितल साळगाकर,  भक्ती सरदेसाई, तन्मयी भिडे, सर्वेश माशेलकर, विनय गावस, मेघना कुरुंदवाडकर, वैष्णवी पै  काकोडे,  विशाल गावस,  श्रद्धा गवंडी,  माधुरी शेटकर, स्नेहा सुतार,  शिल्पा दुबळे परब यांच्यासह अनेकजण सहभागी झाले आहेत. अजून ही साखळी सुरूच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com