‘कोविड-१९’ लढ्यासाठी ‘स्‍मार्ट केओस्‍क’ : आरोग्‍यमंत्री

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

‘कोविड-१९’ लढ्यासाठी  ‘स्‍मार्ट केओस्‍क’ : आरोग्‍यमंत्री 

पणजी,

औद्योगिक क्षेत्र आणि विमानतळावर तसेच सार्वजनिक ठिकाणी ‘कोविड-१९’ पडताळणी चाचण्‍या करण्‍यासाठीची सक्षमता आम्‍ही आता वाढवत आहोत. जनरल इलेक्ट्रिक यांच्‍या सहयोगाने आरोग्‍य खाते आता ‘स्‍मार्ट केओस्‍क’ सुरू करणार आहे. या माध्‍यमातून जागोजागी कोरोना पडताळणी चाचण्‍या करणे शक्‍य होणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे यांनी दिली.
यामुळे अधिकाधिक नमुने तपासणे शक्‍य होणार आहे. हे ‘केओस्क’ राज्‍यातील आरोग्‍य केंद्रे, रेड क्रॉस पणजी, वेर्णा औद्योगिक क्षेत्र, कुंडई औद्योगिक क्षेत्र, म्‍हापसा औद्योगिक क्षेत्र, कुंकळ्‍ळी औद्योगिक क्षेत्र, दाबोळी विमानतळ, एमपीटी तसेच पत्रादेवी तपासणी नाका, केरी तपासणी नाका, मोले तपासणी नाका आणि दोडामार्ग तपासणी नाक्‍यावर ही यंत्रणा बसविण्‍यात येणार असल्‍याची माहिती आरोग्‍यमंत्र्यांनी दिली. विप्रो जी इ हेल्‍थकेअर यांनी या उपक्रमासाठी सहयोग दर्शविल्‍याबद्दल मी त्‍यांचा आभारी असल्‍याचेही मंत्री राणे यांनी त्‍यांच्‍या ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे.

 

संबंधित बातम्या