खारवी समाजातील बांधवांनी एकत्र यावे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

मुरगाव:खारवी समाजातील बांधवांनी एकत्र यावे
माजी उपमुख्यमंत्री अॅड.दयानंद नार्वेकर वास्कोत खारवी बांधवांचा मेळावा
राज्यातील खारवी समाजात फूट पडली आहे. त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करण्यास तत्पर असल्याचे मत, खारवी समाजाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अॅड.दयानंद नार्वेकर यांनी वास्कोतील मेळाव्यात व्यक्त केले.समाजाच्या उत्कर्षासाठी आपापसातील मतभेद मिटवून टाकणे समाजहितासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले.

वास्कोत ४० वर्षांनंतर खारवी बांधवांचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी अॅड.नार्वेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.व्यासपीठावर समाजाचे विद्यमान अध्यक्ष मंगेश चोडणकर, सर्वाधिक काळ अध्यक्षपदी राहिलेले माजी समाज कल्याण मंत्री अॅड. चंद्रकांत चोडणकर उपस्थित होते.
समाजात दोन गटांमध्ये मतभेद निर्माण होऊन फूट पडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.समाजाचे नेतृत्व कोणी करावे या शुल्लक कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला आहे.याचा फटका समाजबांधवांना बसला आहे.ही बाब चिंताजनक असून, नेत्यांनी वेळीच दखल घेऊन वाद मिटविला नाही तर परिस्थिती भयानक होऊ शकते असे अॅड. नार्वेकर म्हणाले.
नेतृत्वपदावरुन चाललेला समाजबांधवांमधील वाद मिटविण्यासाठी आपली तयारी आहे.दोन्ही गटांना सामोपचाराने वाद मिटवायचा असेल तर त्यांनी आपल्या शिष्टाईची अपेक्षा बाळगावी.मी सर्वोत्तपरी सहाय्य करण्यास राजी आहे, असे अॅड.नार्वेकर यांनी जाहीरपणे सांगितले.

कार्निया अंधत्वमुक्ती अभियानाची रविवारपासून सुरुवात

संबंधित बातम्या