भाजीपाल्यात खोर्जुवे झाले स्वयंपूर्ण

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

बऱ्याच लोकांनी स्वत:च्या परससबागेत व शेतात पिकवलेल्या भाजीचा मोठ्या प्रमाणावर आपल्या दररोजच्या आहारात उपयोग करून भाजी व भात शिजवून घरच्या घरी स्वत:ची सोय केली. त्यामुळे टाळेबंदीची झळ खोजुवे गावातील लोकांना जास्त लागली नाही.

श्रीराम च्यारी
हळदोणे

सरकारने टाळेबंदी जारी केल्यानंतर कडधान्य व भाजीपाला खरेदीसाठी राज्यातील लोकांचे बरेच हाल झाले; परंतु, हळदोणे मतदारसंघातील खोर्जुवे गावातील लोक टाळेबंदीच्या काळात भाजी उत्पादनाबाबत स्वावलंबी झाले, असे असले तरी त्या भागातील शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय म्हापसा बाजारपेठ सध्या पूर्णत: बंद असल्याने ठप्प झाला आणि त्यांना आर्थिक नुकसानही झाले.
खोर्जुवे गावातील लोक ऑक्‍टोबर महित्यातील थंडी सुरू झाल्यावर स्वत:च्या शेतात भाजीची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. आपल्या शेतात लागवाड केलेली भाजी मोठ्या प्रमाणात म्हापसा बाजारपेठेत भाजी विकण्यासाठी दररोज ताजी भाजी घैऊन येत असतात. लोकांना ताजी भाजीची आवड असल्यामुळे सकाळीच सर्व भाजी विकून महिला आपापल्या घरी जातात. सरकारने टोळेबंदी केल्यामुळे या वर्षी म्हापसा बाजारात भाजी जिवकणे शक्‍य झाले नाही. यंदा मार्च महिन्यात कोरोना संसर्ग रोगाची सर्वत्र लागण झाल्यामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली व त्यामुळे सर्वांना घरातच रहावे लागले.
खोर्जुवे गावातील बहसंख्य लोकांच्या घरासमोर भाजी लागवड करण्यात आली असल्यामुळे बऱ्याच लोकांनी स्वत:च्या परससबागेत व शेतात पिकवलेल्या भाजीचा मोठ्या प्रमाणावर आपल्या दररोजच्या आहारात उपयोग करून भाजी व भात शिजवून घरच्या घरी स्वत:ची सोय केली. त्यामुळे टाळेबंदीची झळ खोजुवे गावातील लोकांना जास्त लागली नाही.
खोर्जुवे गावातील बहुसंख्य लोक शेती व्यसायावर अवलंबून आहेत. स्वत:च्या शेतात भातशेती करून ते मोठ्या प्रमाणावर भाताचे उत्पादन घेतात. वर्षभर पुरेल एवढे भात स्वत:कडे ठेवून उर्वरीत भात कृषी खात्याच्या खरेदी केंद्रात नेऊन विकतात. तसेच, मोठ्या प्रमाणात भाजी लागवड करून तो भाजीपाला म्हापसा बाजारपेठेत विकला जातो. परंतु, सध्या म्हापसा बाजारपेठ महिनाभर बंद असल्यामुळे त्यांचा भाजीविक्रीचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
हळदोणे मतदारसंघातील हळदोणे, खोर्जुवे, गोर्जुवे, नास्नोडा, मयडे, उसकई, पालये, पुनोळा, बस्तोडा या भागांतील लोक मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन घेत असतात. मिरची, कांदे, मुळे, वालपापडी, चिटकी. तेंडली, रताळी, वांगी, तांबडी भाजी, हळसांदे, चवळी, वाली या भाज्यांची व पिकांची लागवड स्वत:च्या शेतात ते करतात. हिरव्या मिरच्यांचेही उत्पादन घेतले जाते. तथापि, भाजी विक्री करण्यासाठी बाजारपेठ नसल्यामुळे स्वत:च्या गावांतच ठिकठिकाणी भाजीविक्री करण्यात येत आहे.

खोर्जुवे गावातील लोक दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून भाजपाला व वायंगण भातशेतीची लागवड करतात. टाळेबंदी जारी केल्यानंतर लोकांना अन्नधान्य व भाजीपाल्यासाठी घराबाहेर पडणे शक्‍य झाले नाही. अशा स्थितीत खोर्जुवे गावातील लोकांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला व भातशेती केल्याने असलेल्या तांदळांचा वापर करून सुमारे एक महिन्याच्या टाळेबंदीच्या काळात एकंदर परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला.
- दीपक नाईक (माजी सरपंच तथा विद्यमान पंच, हळदोणे)

संबंधित बातम्या