मडगावात किंग ‘मोमो’ची राजवट सुरू

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

 

कार्निव्हल मिरवणुकीत सहभागी चित्ररथ

मडगाव पालिका मुख्याधिकारी अजित पंचवाडकर, मडगाव कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आर्थूर डिसिल्वा इतर समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी किंग मोमोचा संदेश ‘खावो पियो मजा करो’ असा असून मडगावात किंग ‘मोमो’ची राजवट सुरू झाल्याचे सांगितले.
कार्निव्हलची सुरवात किंग मोमोच्या चित्ररथाने करण्यात आली. ‘खा प्या मजा करा’ असा संदेश देत उपस्थितांना चॉकलेट वाटण्यात आले.

नावेली : मडगावात रविवारी कार्निव्हलला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. ‘खा प्या मजा करा’ असा संदेश देत किंग ‘मोमो’ यांची राजवट मडगावात सुरू झाली. यावेळी उपमुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

कोलवा सर्कल ते लेक प्लाझा फातोर्डापर्यंत कार्निव्हल मिरवणूक काढण्यात आली. विविध विषयावर वेशभूषा स्पर्धा, कार्निव्हल नृत्य, कुणबी नृत्य सादर करण्यात आली. गोमंतकिय पारंपरिक खेळावर आधारित चित्ररथ, मातीपासून तयार करण्यात येणारी भांडी तसेच अनेक लक्ष वेधून घेणारे चित्ररथ होते.

कार्निव्हलमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोलवा सर्कल ते लेक प्लाझा फातोर्डा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मडगाव शहरातील वाहतुकीवर परिणाम जाणवला नाही. कार्निव्हल मिरवणुकीत किंवा चित्ररथात कुठल्याही धर्माचा जातीचा वादग्रस्त असा संदेश देण्यात आला नव्हता. जास्तीत जास्त चित्ररथ हे पर्यावरण पारंपरिक संस्कृतीचे दर्शन देणारे होते. यावर्षी दर्जात्मक चित्ररथांना जास्त प्राधान्य देण्यात आले होते.
 

 

 

विद्यापीठात पर्रीकरांच्या नावे विभाग सुरू होणे अशक्य..!

संबंधित बातम्या