"किसान रथ अॅप' ठरतोय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

Dainik Gomantak
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

टाळेबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध करण्यासाठी किसान रथ या अॅपद्वारे शेतकरी ट्रक बूक करू शकतो. त्याशिवाय टाळेबंदीच्या काळात टपाल खात्याच्या गाडीतूनही पॅक बंद फळे किंवा फुले नेता येऊ शकणार आहे.

पणजी,

केंद्र सरकारच्या कृषी खात्याने तयार केलेल्या ‘किसान रथ मोबाईल अॅप’ सध्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. गोव्यातील शेतकऱ्यांनाही ही योजना मदतमार ठरू शकते.
टाळेबंदीच्या काळात वाहतूक व्यवस्था सहज उपलब्ध करण्यासाठी किसान रथ या अॅपद्वारे शेतकरी ट्रक बूक करू शकतो. त्याशिवाय टाळेबंदीच्या काळात टपाल खात्याच्या गाडीतूनही पॅक बंद फळे किंवा फुले नेता येऊ शकणार आहे. टपाल खात्याच्या गाडीत सुमारे तीन टन माल नेला जाऊ शकतो. गाडीतील टपाल त्या मालापासून सुस्थितीत राहणे आवश्यक आहे. रत्नागिरीच्या एका आंबा उत्पादक शेतकऱ्याने ३ टन आंबे टपाल खात्याच्या गाडीतून मुंबई बाजारपेठेत नेले होते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, गोव्यातील दोन जिल्हे अशा सहा जिल्हयांच्या परिमंडलाचे सहायक संचालक वालराज के. यांनी सांगितले की, टपाल खात्याची टाळेबंदीच्या काळात टपाला बरोबरच औषधे ने-आण करण्यासाठी फायदेशीर ठरली आहे. त्याचबरोबर ही वाहने टाळेबंदीच्या काळात किसान रथ म्हणून सेवा देत आहेत. रत्नागिरीतून टपाल खात्याच्या गाडीतून वाशी मार्केटला आंबे नेले. आणखी काही शेतकऱ्यांनी ही गाडी बूक केली आहे. पॅकबंद फळे नेण्यासाठी ही वाहने वापरता येऊ शकतात.
गोव्यातील आंबा उत्पादकांनाही त्यांचे आंबे मोठया शहरात पोहोचवायचे असल्यास ते ही या योजनेचा फायदा घेऊ 
शकतात. 

चौकट करणे
कर्मचारी क्वॉरंटाईन
कोल्हापूरला गोव्यातून टपाल घेऊन गेलेले दोन कर्मचारी क्वॉरंटाईन झाले आहेत. कोल्हापूरला टपाल पोहोचून संध्याकाळी त्या दोघांना पत्रादेवी या तपासणी नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना क्वॉरंटाईन केले.

संबंधित बातम्या