आगोंद येथे कोमुनीदाद जमीनीत बेकायदेशीर बांधकामाचे निरीक्षण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

आगोंद:आगोंद येथील बेकायदेशीर बांधकामाचे निरीक्षण
आगोंद पंचायत क्षेत्रातील कोमुनीदाद संस्थेच्या जमिनीत केलेल्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात केलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रशासनाने त्या बांधकामाचे निरीक्षण केले.मात्र या प्रकरणी कठोर कारवाई झाली तरच अन्य लोक बेकायदेशीर बांधकामे बांधताना धजावणार नाहीत.त्यमुळे अशा प्रकरणे गांभीर्याने घ्यावीत अशी मागणी केली जात आहे.
काणकोण गटविकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी भिवा वेळीप, उपसरपंच शिल्पा पागी व पंचायत सचिव सुशांत लोलयेंकर यांनी आज सदर बेकायदेशीर बांधकामांचे निरीक्षण केले.

१५ जानेवारी २०२० रोजी पंचायत खात्याच्या उपसंचालक कार्यालयातून गटविकास अधिकारी कार्यालयाला तक्रारदार नारायण भिसो वेळीप व फेर्नांडो फर्नांडिस यांनी केलेल्या तक्रारीला अनुसरून सदर बेकायदेशीर बांधकामाचा अहवाल पाठवण्याचा आदेश देण्यात आला होता.तक्रारीची दखल घेऊन जुवावं जुझे फर्नांडिस, रुपा शेट्टी, लक्ष्मण सु. पागी, रामदास सु. पागी, क्रोम्पटन फर्नांडिस, संतोष पागी या बांधकाम मालकांच्या उपस्थितीत आरोप असलेल्या बांधकामाचे निरीक्षण करण्यात आले.या ठिकाणी केलेल्या निरीक्षणाचा अहवाल लगेच पंचायत उपसंचालक कार्यालयाला पाठवून देण्यात येणार असल्याचे पंचायत सचिव सुशांत लोलयेंकर यांनी सांगितले.
आगोंद पंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या भागातील तसेच कर्नाटकातील नागरिकांना आवश्यक असलेले सर्व कागदी दस्तावेज उपलब्ध करून देण्यासाठी गुप्तरित्या काही स्थानिकच गुंतलेले आहेत.या लोकांना उघडे पाडण्याकरता कुणीच पुढे येत नाही.हे स्थानिक जागृत नागरिकांचे दुर्दैव आहे, अशा प्रतिक्रिया या भागातून व्यक्त होत आहेत.

विल्सन गुदिन्हो यांना अटकपूर्व जामीन मंजूर

संबंधित बातम्या