चार रेलगाड्या बंद करण्याची कोकण रेल्वेवर नामुष्की!

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

पणजी: यशवंतपूर (बंगळूर) वास्को मार्गावर दक्षिण पश्चिम रेल्वेने नवीन गाडी आजपासून सुरू केली. या गाडीमुळे अन्य चार गाड्या बंद करण्याची वेळ कोकण रेल्वेवर आली आहे.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १६५१३ बंगळूर कारवार एक्सप्रेस ११ मार्चपासून, १६५१४ कारवार बंगळूर एक्सप्रेस ९ मार्चपासून, १६५२३ बंगळूर कारवार एक्सप्रेस ८ मार्चपासून, तर १६५२४ कारवार बंगळूर एक्सप्रेस १२ मार्चपासून बंद करण्यात येत आहे.

यशवंतपूर कारवार मार्गावर आजपासून नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी नीलमंगला, श्रवणबेळगोळ पाडील बगल लोहमार्गाने जा ये करणार आहे. १६५९५ व १६५९६ या क्रमाकांना या गाडीचे आरक्षण करता येईल. ही गाडी दररोज यशवंतपूर येथून सायंकाळी पावणेसात वाजता निघून कारवारला सकाळी ८.२५ वाजता पोचणार आहे. कारवारहून ही गाडी दररोज सायंकाळी सहा वाजता निघून सकाळी ८ वाजता यशवंतपूरला पोचणार आहे. या गाडीला चिकबनावरस चन्नरायपटना, हासन, संकलेश्वर, सुब्रमण्य रोड, कानिरु हॉल्ट, काबकपुत्तूर, बंतवाला, सुरतकल, मुल्की, उडुपी, बारकूर, कुंदापूर, मुकांबिका रोड, बायंदूर, भटकळ, मुरडेश्वर, होन्नावर, कुमठा, गोकर्ण रोड, अंकोला येथे थांबे आहेत.

या गाडीला १४ डबे असतील. त्यात द्वितीय श्रेणी वातानुकुलितचा एक, तृतीय श्रेणी वातानुकुलितचा १ आणि ७ शयन डबे असतील. सर्वसाधार श्रेणीचे ३ डबे असतील. हीच गाडी पुढे वास्कोपर्यंत अनारक्षित एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. कारवारहून सकाळी साडेआठ वाजता ती वास्कोला निघेल आणि सकाळी साडेदहा वाजता वास्कोत पोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी वास्कोतून दुपारी ३.२० वाजता निघून कारवारला सायंकाळी पावणेसहा वाजता पोचणार आहे. या गाडीला मडगाव येथे थांबा आहे. ही गाडी या मार्गावर ६५५१ आणि ६५५२ क्रमांकाने धावणार आहे.

संबंधित बातम्या