VIDEO: कबड्डी खेळतानाच हार्टअ‍ॅटक, खेळाडूचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद

VIDEO: कबड्डी खेळतानाच हार्टअ‍ॅटक, खेळाडूचा मृत्यू कॅमेऱ्यात कैद
A 20 year old man died on the kabaddi ground

छत्तीसगड: धमतरी येथिल गोजी गावात कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान एका 20 वर्षीय तरूणाचा रणांगणातच मृत्यू झाल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे.  सध्या याघटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील गोजी गावात कबड्डी स्पर्धेच्या सामन्यादरम्यान एका 20 वर्षीय तरूयणाचा मृत्यू झाला. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. खेळाडू जमीनीवर कोसळतांनाचा एक व्हिडिओ प्रेक्षकांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. धमतरी जिल्ह्यातील कोकडी गावाचा हा तरूण होता. नरेंद्र साहू एसे त्याचे नाव होते. कबड्डी मैदानात जेव्हा त्याला खेळाडूने पकडले तेव्हा ही घटना घडली.

माहितीनुसार, साहूने प्रतीस्पर्ध्याच्या अंगावर छापा टाकला होता आणि परत जातांना एका खेळाडूने त्याला मागून खेचले आणि मग इतरही खेळाडू त्याला ओढून धरणयास सामिल झाले.दरम्यान त्याच्या मानेला झटका पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

 कुरूड पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार रामनरेश शेंगर यांनी सांगितले की, त्याने लवकरच दम सोडला होता. आणि नंतर तो बेशुध्द पडला. पुढे सांगताना ते म्हणाले की,  असे होताच सहकारी  खेळाडूंनी आणि गावच्या सरपंचांनी त्याला कुरूड रूग्णालयात दाखल केले. आणि त्याला डॉक्टरांनी लगेच मृत घोषीत केले.

"प्राथमीक तपासात साहू यांचे हृदयविकीराच्या झटक्याने निधन झाले असे आम्हाला वाटते, मात्र आम्ही पोस्टमार्टमच्या रिपोर्टची प्रतिक्षा करत आहोत. असे या प्रकरणाचा तपास करणारे सेनगर यांनी सांगितले. पोलिसांनी कलम 164 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com