टेनिसचा सम्राट करणार स्वित्झर्लंडची ब्रॅंडिग

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

जगप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररला स्वित्झर्लंड सरकारने टूरिझमचा ब्रॅंड अ‍ॅम्बसेडेर घोषीत केले आहे.

जगप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडररला स्वित्झर्लंड सरकारने टूरिझमचा ब्रॅंड अ‍ॅम्बसेडेर घोषीत केले आहे. स्वित्झर्लंडचे टेनिस जगतात वर्षानुवर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्य़ा फेडररने स्विस राष्ट्रीय पर्यटन मंडळाबरोबर करार केला आहे. याचा उद्देश स्वित्झर्लंडच्या पर्य़टनाला प्रोत्साहन देणे हा आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगामध्ये पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला असताना फेडरर आणि स्वित्झर्लंड जागतिक स्तरावर देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र काम करतील. ‘’पर्यटनाला चालना देण्यासाठी रॉजर फेडरर हा योग्य व्यक्ती आहे,’’ असे स्वित्झर्लंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माऊट निडेगर यांनी सांगितले आहे. (Switzerlands branding will be the emperor of tennis)

INDvsENG: हार्दिक पांड्याने हात जोडून मागितली टिम इंडियाची माफी; व्हिडिओ व्हायरल

यावर फेडरर म्हणाला, ‘’मी टेनिस कोर्टवर पाऊल ठेवाताना स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. माझे नाव जिथेही जाईल त्या ठिकाणी माझ्याबरोबर स्वित्झर्लंडचा ध्वज असावा, असे मला सतत वाटते. गेल्या 22 वर्षापासून टेनिस कोर्टवर ही कामगिरी करण्याचा मला अभिमान आहे. स्वित्झर्लंडच्या पर्यटन क्षेत्राशी जोडणे तार्कीक पाऊल आहे.’’ 

 

 

संबंधित बातम्या