झहीर खान आणि सागरिका घाटगे लवकरच देणार 'गोड बातमी'?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

सध्या झहीर आणि सागरिका दोघेही  संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत. झहीर मुंबई इंडियन्सचा एक महत्वाचा भागही आहे.

नवी दिल्ली-  भारतीय गोलंदाजीचा एकेकाळचा कणा असलेला गोलंदाज झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटके हे 2017मध्ये विवाह बंधनात अडकले होते. कित्येक वर्ष गोलंदाजीची भीस्त आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या झहीर खानवर आता अजून एक जबाबदारी पडत आहे. या दोघांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याची माहिती झहीरच्या जवळच्या मित्रांनी पुणे मिररला दिली आहे. सध्या झहीर आणि सागरिका दोघेही  संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत. झहीर मुंबई इंडियन्सचा एक महत्वाचा भागही आहे.

 झहीरने त्याचा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच  मुंबई इंडियन्सचे त्याचे सहकारी आणि पत्नी सागरिकासोबत संयुक्त अरब अमिरातीमध्ये साजरा केला होता. मुंबई इंडियन्स संघाने त्याबद्दलचा व्हिडिओही संघाच्या सोशल मिडीयाच्या अकाउंटवरून शेअर केला होता. त्यामधे झहीर खान केक कापताना दिसला होता. जहीरच्या वाढदिवसादिवशी त्याने सागरिकासोबतचे फोटो शेअर केले होते.   

अभिनेत्री सागरिका घाटके आणि क्रिकेटर झहीर खानने 2017मध्ये कोर्ट मॅरेज पद्धतीनं लग्न केले होते. त्यानंतर या जोडप्याने 27 नोव्हेंबर मुंबईतील ताज हॉटेलमध्ये मोठी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती. त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींनी हजेरी लावली होती. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही त्यांच्या घरी तिसरा व्यक्ती येणार असल्याची गोड बातमी याआधीच दिली आहे. ही माहिती त्यांनी सोशल मिडीयावरून दिली होती. सध्या अनुष्का शर्माही  दुबईत आहे. विराट कोहली सध्या रॉयल चॅलेंजर बॅंगलोरचा कर्णधार आहे.
 

संबंधित बातम्या