विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स; हा पराक्रम करणारा पहिला भारतीय

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सनी 10 कोटींची संख्या गाठली आहे. या रेकॉर्डमुळे आता तो रोनाल्डो, मेस्सी आणि नेमारच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सनी 10 कोटींची संख्या गाठली आहे. या रेकॉर्डमुळे आता तो रोनाल्डो, मेस्सी आणि नेमारच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि तरूणांच्या गळ्यातला ताईत असलेला विराट कोहली क्रिकेटच्या मैदानाबरोबरच सोशल मीडियावरही कमालीचा अ‍ॅक्टीव्ह आहे. सोमवारी विराट कोहलीच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली. एवढे फॉलोअर्स मिळवणारा विराट कोहली हा  पहिला भारतीय ठरला आहे. 

INDvsENG : खेळपट्टीवरून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी इंग्लंडला फटकारलं

विराट कोहलीने आता 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा गाठल्यानंतर फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि नेमार यांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. भारतात विराट कोहलीनंतर टॉप फॉलोअर्सच्या लिस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा 6 कोटी फॉलोअर्ससह दुसर्‍या क्रमांकावर आहे. इंस्टाग्रामवर ख्रिस्तियानो रोनाल्डोचे 26 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो संपूर्ण जगात प्रथम क्रमांकावर आहे. 22.40 करोड फॉलोअर्ससह प्रसिद्ध हॉलिवूड सिंगर एरियाना ग्रेंड दुसर्‍या आणि डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार व हॉलिवूड अभिनेता असलेला ड्वेन जॉनसन 22 करोड फॉलोअर्ससह तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

फिरकीपटूमध्ये अव्वल कोण? अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामव्यतिरिक्त इतर सोशल मीडिया साइट्सवरदेखील बरेच फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर विराट कोहलीला 4 कोटींहून अधिक लोक फॉलो करतात आणि त्याच्या फेसबुक प्रोफाइलवर 3.6 करोडहून अधिक लाईक्स आहेत. विराट कोहली त्याच्या खाजगी आयुष्यातील पोस्ट क्वचितच सोशल मीडियावर शेअर करतो. परंतु, तो अनेक ब्रॅंड्सचा अ‍ॅम्बेसिडर असल्याने तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर ब्रॅंड प्रमोशनसाठी करताना दिसून येतो. 

संबंधित बातम्या