10 years of 2011 world Cup: सेहवागने ट्विट केला आयुष्याचा 'तो' एक क्षण

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

वीरेंद्र सेहवागनेही भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाल्याच्या विलक्षण आठवणीने ट्विट केले आहे. "2 एप्रिल: 10 वर्षांपूर्वी, आयुष्याचा एक क्षण." असे सेहवागने लिहिले आहे.

2011 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट संघाने दहा वर्षे पूर्ण केली असतील, पण दरवर्षी 2 एप्रिलची तारीख येताच या भव्य विजयाच्या आठवणी पुन्हा चाहत्यांच्या मनामध्ये नव्याने उमटतात. वीरेंद्र सेहवागनेही भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन झाल्याच्या विलक्षण आठवणीने ट्विट केले आहे. "2 एप्रिल: 10 वर्षांपूर्वी, आयुष्याचा एक क्षण." असे सेहवागने लिहिले आहे.

2 एप्रिल 2011 रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला 6 गडी राखून हरवून भारतीय संघाने दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकला. या शीर्षकासह भारताने वर्ल्ड कपचा 28 वर्षांचा विक्रम मोडला होता. 28 वर्षाआधी कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजला पराभूत करून भारताने प्रथमच वल्ड कप जिंकाला होता. 

10 years of 2011 World Cup Winning : वर्ल्ड कपमधील विजयातील पडद्यामागचे 14 हिरो 

2011 च्या वर्ल्ड फायनलमध्ये सेहवाग आपले खाते उघडू शकला नाही परंतु संपूर्ण टुर्नामेंटम्ध्ये त्याच्या बॅटची कमाल त्याने दिखविली होती.  सेहवागने 8 सामन्यात 47 च्या सरासरीने आणि 122 च्या स्ट्राइक रेटने 380 धावा केल्या होत्या.  स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये 7 व्या स्थानावर होता. या स्पर्धेत त्याने बांगलादेशविरुद्ध 175 धावांची शानदार खेळीही केली होती.

संबंधित बातम्या