10 years of 2011 World Cup Winning : वर्ल्ड कपमधील विजयातील पडद्यामागचे 14 हिरो

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

ICC CWC 2011 IND v SL Final: श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरने  97 आणि धोनीने नाबाद 91  धावा केल्या होत्या. युवराज सिंगने नाबाद 21 धावा केल्या त्याशिवाय 2 विकेट घेतल्या होत्या. अखेरच्या चेंडूवर षटकारासह धोनीने टीम इंडियासाठी शानदार विजय मिळविला.

आजपासून ठीक 10 वर्षा आधी म्हणजेच 2 एप्रिल 2011 रोजी इंडियन क्रिकेट टीमला (India Cricket Team) 28 वर्षांनंतर वल्ड चॅम्पीयनमध्ये स्थान प्राप्त झाले होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेला पराभूत करून महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. गंभिरने अंतिम सामन्यात 97 धावांची खेळी केली होती.

सामन्यात गौतम गंभीरने (Gautam Gambhir) 97  धावा आणि धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या. युवराज सिंगने (Yuvraj Singh)  नाबाद 21 धावा केल्या त्याशिवाय 2 विकेट मिळवल्या होत्या. वेगवान गोलंदाज जहीर खाननेही 2 गडी बाद केले होते. अखेरच्या चेंडूवर षटकारासह धोनीने टीम इंडियासाठी शानदार विजय मिळविला होता. 

युवराज 'अज्ञात' नायक होता

"विश्वचषक विजयाचे बहुतेक 14 अज्ञात नायक होते. पहिल्या सामन्यात शतके ठोकणारा मुनाफ, मी, हरभजन सिंग आणि विराट कोहली, पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी करणारा सुरेश रैना. वरील सर्व खेळाडूंचे योगदान अविश्वसनीय होते. आजच्या दहा वर्षांपूर्वी जर मी पाहिले तर मला वाटते की युवराज 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' असूनही एक 'अज्ञात' नायक होता. लोक फक्त त्या एका सिक्सबद्दल बोलत असतात. पण आपण हे सर्व श्रेय त्या पुर्ण टिम ला जाते. या सर्वांच्या योगदानामुळेच भारत विश्वविजेता ठरला होता, असे या विजयाची आठवण करुन देत गंभीरने एका मुलाखतीत  सांगितले.

अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी 11 चेंडूत 4 धावांची गरज होती, तेव्हा धोनीने एक षटकार लगावला आणि वल्ड कप भारताच्या नावावर केला. युवराजने वर्ल्ड कपमध्ये 362 धावा केल्या शिवाय 15 विकेट घेतल्या होत्या. भारताला टी -20 विश्वचषक जिंकून देण्यात युवीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

"युवी दोन्ही विश्वचषकात सर्वात मोठा खेळाडू होता. युवराजने पाचव्या गोलंदाजाची भूमिका साकारली होती. लोक म्हणायचे की मी या विजयाचा अज्ञात नायक आहे. पण माझ्यासाठी दोन्ही विश्वचषकात युवराजने अज्ञात नायकाची भूमिका केली होती. मला वाटते की त्याच्या योगदानाशिवाय 2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला नसता. माझ्यासाठी दोन्ही विश्वचषकात तो एक मोठा खेळाडू होता. दोन्ही विश्वचषकात मला एका खेळाडूचे नाव द्यायचे असेल तर तो युवराज असेल. 2007 च्या टी -20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात मी 75 धावा केल्या होत्या परंतु मला वाटते की युवराजने केलेल्या कामगिरीची बरोबरी कोणाही करू शकत नाही," असे मत गंभीरने व्यक्त केले.

संबंधित बातम्या