VIDEO: फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा डान्सिंग मूड

अलीकडेच सुट्टीवर गेलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 16 कोटी रुपयांच्या बुगाटी कारचा अपघात झाला
VIDEO: फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचा डान्सिंग मूड
Cristiano RonaldoScreenshot

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेला क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. तो अनेकदा फुटबॉलच्या मैदानावर गोल करताना दिसला असेल, पण सध्या रोनाल्डो त्याच्या डान्समुळे चर्चेत आहे. खरंतर, सध्या रोनाल्डो स्पेनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टी साजरी करत आहे. जिथे तो पत्नी आणि मुलांसोबत मस्ती करताना दिसत आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओही खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डान्स करत आहे. (Cristiano Ronaldo dance video)

अलीकडेच सुट्टीवर गेलेला दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 16 कोटी रुपयांच्या बुगाटी कारचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर रोनाल्डो पहिल्यांदाच दिसला. रोनाल्डो कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. त्याने आपली कार फक्त माजोर्का येथे फिरण्यासाठी नेली होती.

Cristiano Ronaldo
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या कारचा अपघात, 16 मिलियन बुगाटीचा चक्काचूर

या व्हिडिओमध्ये मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार रोनाल्डो त्याच्या डान्स मूव्हज करताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि मुलेही दिसत आहेत. रोनाल्डोचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तो माजोर्का बेटावर कुटुंबासह आनंद घेत आहे. त्याच वेळी, त्याला 27 जूनपर्यंत युनायटेड किंगडमला परतायचे आहे. त्यामुळे परतण्यापूर्वी तो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Cristiano Ronaldo
ICC क्रमवारीत टीम इंडियाची कामगिरी, इशान किशनसह दिनेश कार्तिकचीही मोठी झेप

विशेष म्हणजे रोनाल्डो हे फुटबॉलमधील मोठे नाव आहे. तो फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. फुटबॉलच्या मैदानावर आपल्या टॅलेंटने सगळ्यांना वेड लावणारा रोनाल्डो डान्समध्येही मागे नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, त्याने हे सिद्ध केले आहे की फुटबॉलच्या मैदानापासून दूर राहूनही तो प्रत्येकाला आपला चाहता बनवू शकतो. या सुट्टीनंतर तो फुटबॉलच्या मैदानात परतणार आहे. यानंतर त्याला विश्वचषकही खेळायचा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com